Kolhapur: शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला अखेर कागलमध्ये मिळाली जागा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:48 IST2025-04-28T14:47:43+5:302025-04-28T14:48:32+5:30

कोल्हापूर : नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. तोपर्यंत महाविद्यालयाला जागेचा शोध होता, ...

Government Ayurveda College finally gets land in Kagal Kolhapur | Kolhapur: शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला अखेर कागलमध्ये मिळाली जागा 

संग्रहित छाया

कोल्हापूर : नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. तोपर्यंत महाविद्यालयाला जागेचा शोध होता, अखेर कागल येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची इमारत उपलब्ध करुन दिली आहे. त्याबाबतचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी झाला आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित शंभर रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय मंजूर केले आहे. मात्र, त्यासाठी अपेक्षित इमारत नसल्याने आगामी शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय कोठे सुरू करायचे? असा प्रश्न वैद्यकीय शिक्षण विभागासमोर होता. महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे, पण तोपर्यंत कागल येथील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ताब्यातील कसबा सांगाव रोड कागल येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू करण्याबाबत शासनपातळीवर चर्चा झाली. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या उच्चीकरणातंर्गत बांधकाम व अनुषंगिक बाबीसाठी केंद्र सरकारकडून आगामी वर्षामध्ये निधी उपलब्ध होणार असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाने संबंधित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करून संबंधित प्रशिक्षण संस्थेला परत करण्याची कार्यवाही करावी, असे उपसचिव एम. बी. ताशिलदार यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Government Ayurveda College finally gets land in Kagal Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.