दुग्धविकासमंत्री जानकरांची ‘राही’ च्या घरी सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:39 IST2018-08-27T10:38:28+5:302018-08-27T10:39:30+5:30

जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल  राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राहीच्या राजारामपुरी येथील राहत्या घरी भेट दिली.

Goodwill visit visit to the house of Rakhi Sankranti Jankar's 'Rahi' | दुग्धविकासमंत्री जानकरांची ‘राही’ च्या घरी सदिच्छा भेट

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या राही सरनोबत हिच्या राजारामपुरी येथील राहत्या घरी मंत्री महादेव जानकर यांनी भेट देत वडील जीवन सरनोबत यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी किरण पाटील, श्रृतिक पाटील उपस्थित होते.

ठळक मुद्देदुग्धविकासमंत्री जानकरांची ‘राही’ च्या घरी सदिच्छा भेट कुटुंबीयांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केल्या शुभेच्छा

कोल्हापूर : जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्याराही सरनोबत हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल  राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राहीच्या राजारामपुरी येथील राहत्या घरी भेट दिली.

यावेळी दुग्धविकास मंत्री जानकर यांनी राहीचे वडील जीवन सरनोबत यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी राहीची गौरवास्पद कामगिरी यापुढील खेळाडूंनाही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी किरण पाटील, श्रृतिक पाटील आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Goodwill visit visit to the house of Rakhi Sankranti Jankar's 'Rahi'