शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या नागरगोजेकडून सव्वा किलो सोने हस्तगत

By admin | Updated: June 16, 2014 00:40 IST

३२ घरफोड्यांची कबुली : अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची माहिती

कोल्हापूर : शहरात भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल घरफोड्या संशयित राजू प्रकाश नागरगोजे ऊर्फ राजवीर सुभाष देसाई (वय २७, रा. उचगाव गडमुडशिंगी, ता. करवीर) याच्याकडून ३२ गुन्हे उघडकीस आले असून सव्वा किलो सोने व एक किलो चांदीचे दागिने असा सुमारे ३१ लाख २७ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिली. सराईत गुन्हेगार राजू नागरगोजे याला जुना राजवाडा पोलिसांनी हुशारीने अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहरात जुना राजवाडा, करवीर, शाहूपुरी, राजारामपुरी, इचलकरंजी, सांगली, मिरज, कऱ्हाड, अहमदाबाद आदी ठिकाणी ३२ पेक्षा जास्त फ्लॅट फोडून सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली होती. त्याने चोरलेले दागिने गुजरीतील वशीकर ज्वेलर्स, बेळगाव येथील प्रकाश नावाच्या सराफाला विकले होते. तेथून हे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले. त्यामध्ये सव्वा किलो सोने व एक किलो चांदीचे दागिने असा सुमारे ३१ लाख २७ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये गंठण, ब्रेसलेट, रिंगा, अंगठ्या, आदी दागिन्यांचा समावेश आहे. सराफांना सोने विकण्यासाठी त्याची आई व पत्नी त्याला मदत करत असत. त्याचा साथीदार राहुल कांबळे (२९, रा. कुरुंदवाड) यालाही पोलिसांनी अटक केली. सध्या तो बिंदू चौक कारागृहात आहे तर नागरगोजे याला आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित सोनकांबळे, कॉन्स्टेबल संदीप जाधव, मोहन गवळी आदींसह गुन्हे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)