शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील बीडमध्ये पडतो सोन्याचा पाऊस, पुनश्च प्रत्यय; शेतात सापडली सुवर्णमुद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:00 IST

कसबा बीड (ता. करवीर) गावात सोन्याचा पाऊस पडतो ही आख्यायिका गेल्या अनेक शतकांपासून प्रचलित आहे. कसबा बीडच्या ग्रामस्थांना सतत याचा प्रत्यय येतोच. अनेक गावकऱ्यांना गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत.

कसबा बीड : कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड (ता. करवीर) गावात सोन्याचा पाऊस पडतो ही आख्यायिका गेल्या अनेक शतकांपासून प्रचलित आहे. कसबा बीडच्या ग्रामस्थांना सतत याचा प्रत्यय येतोच. अनेक गावकऱ्यांना गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत.सोमवारी (दि. १४) कसबा बीडच्या ग्रामस्थ मंगल सुनील बीडकर यांना त्रिशूळछाप सुवर्णमुद्रा मिळाली. गावातील श्री कल्लेश्वर मंदिर परिसरात शेतात भांगलन करताना हा बेडा त्यांना सापडला आहे.स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना ‘बेडा’ असे संबोधतात. बीडकर यांना सापडलेल्या हा बेडा ६ मिमीचा असून त्यावरील अंकण अजूनही सुस्पष्ट आहे. याच्या एका बाजूवर त्रिशूळ आणि काही टिंबांचे अंकण तर दुसऱ्या बाजूवर उभवटा दिसतो.गेल्या वर्षीही कसबा बीड गावात सोने सापडण्याचा प्रकार अनेकवेळा घडला आहे. चालू वर्षातील ही पहिलीच घटना आहे. एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. गावात सापडणारे असे हे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभवाची जणू साक्ष देत आहेत.

दैवी आशीर्वाद म्हणून पुजन

कसबा बीडमध्ये आजही अशा बेड्यांना दैवी आशीर्वादाच्या स्वरूपात पुजले जाते. कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसGoldसोनं