शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोयत्याने वार करत सराफाचा खून, आर्थिक व्यवहारातून स्वप्नवेल पॉईंटनजीक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:18 IST

चंदगड : आर्थिक व्यवहारातून कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सराफाचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी तिलारीनगर येथील स्वप्नवेल पाॅंईटनजीक कॅनाॅलजवळ ...

चंदगड : आर्थिक व्यवहारातून कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सराफाचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी तिलारीनगर येथील स्वप्नवेल पाॅंईटनजीक कॅनाॅलजवळ घडली. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चंदगड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे.

बाळकृष्ण अनंत सोनार (वय ६७, मूळचे कालकुंद्री, सध्या रा. तुडीये) असे मृत सराफाचे नाव असून, संशयित आरोपी रमेश बाबू पाटील (५१, रा. तुडीये) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी की, रमेश याने सराफ बाळकृष्ण यांच्याकडून गेल्या काही वर्षांपूर्वी सोने खरेदी केले होते. मात्र, त्यातील काही रक्कम अद्यापही दिली नाही. यासाठी अनेकवेळा बाळकृष्ण यांनी रमेशकडे ती रक्कम मागितली; पण त्याने दुर्लक्षच केले.मंगळवारी दुपारी मात्र तुझे पैसे देतो असे सांगून त्याने दुचाकीवरून सोनार यांना तिलारीनगर येथे नेले. स्वप्नवेल पाॅईंटनजीक कॅनाॅलजवळ ते आले असता रमेशने सोनार यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला केला. त्यांच्या हात, पाय व मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनार यांना तिथेच सोडून रमेशने पोबारा केला.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ओरडत असलेले जखमी सोनार निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी दुसरे पथक संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी तुडीये येथे आले असता रक्ताने माखलेले कपडे धुताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जखमी सोनार यांचा उपचार सुरू असताना आठच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

सोबतचे सोने गायब?बाळकृष्ण सोनार हे पाटबंधारे खात्यात नोकरीला होते. नोकरीत असतानाच त्यांनी सोनार व्यवसायात जम बसवत तुडीयेला वास्तव्यास गेले. सोनार यांच्याकडे कायम सोने जवळ असायचे. मंगळवारीही त्यांच्याजवळ सोने होते. घटनेनंतर मात्र ते गायब झाले. त्यामुळे याबाबत उलटसुलट तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस