सोन्याचे बेडे; एक न उलगडलेले कोडे!, कोल्हापुरातील कसबा बीडमध्ये मृग नक्षत्राच्या पावसात सापडतात सोन्याची नाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:41 IST2025-08-06T16:41:08+5:302025-08-06T16:41:27+5:30

सोन्याचा पाऊस पडतो अशी एक अख्यायिका आहे आणि त्या पावसाची प्रचिती सातत्याने होत असते

Gold coins are found in the rain of the deer constellation in Kasba Beed Kolhapur | सोन्याचे बेडे; एक न उलगडलेले कोडे!, कोल्हापुरातील कसबा बीडमध्ये मृग नक्षत्राच्या पावसात सापडतात सोन्याची नाणी

सोन्याचे बेडे; एक न उलगडलेले कोडे!, कोल्हापुरातील कसबा बीडमध्ये मृग नक्षत्राच्या पावसात सापडतात सोन्याची नाणी

कसबा बीड : प्राचीन काळापासून करवीर तालुक्यातील कसबा बीड हे गाव भोजराजाची राजधानी आणि लष्करी तळ म्हणून ओळखले जाते. येथे सोन्याचा पाऊस पडतो अशी एक अख्यायिका आहे आणि त्या पावसाची प्रचिती सातत्याने होत असते.

मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाला की, या ठिकाणी शेतशिवारात, रस्त्याच्या बाजूला, घरांच्या छपरावर, शेणाच्या पू आदी ठिकाणी सुवर्ण मुद्रा, म्हणजे यादवकालीन सोन्याच्या नाण्यांची सापडणे नियमित झाले आहे. बीड या गावाच्या नावावरून या नाण्यांना 'सोन्याचे बेडे', असे संबोधले जाते. मात्र हे एक न उलघडणारे कोडे झाले आहे.

या परिसरातून विरगळ, चांदीच्या आणि साध्या नाण्यांसह सोन्याचे नाग, पाषाणी मूर्ती, शिलालेख व प्राचीन मंदिरांचे अवशेषदेखील सापडतात. ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आली आहे. मुख्यत्वे करून सन २०२० पासून कसबा बीडमधील ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन व संशोधन करणाऱ्या "यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड" या संघटनेने या सुवर्ण मुद्रांविषयी माहिती संकलित आणि प्रसारित करणे सुरू केले आहे.

कसबा बीड येथे सन २०२० पासून आजपर्यंत शेतशिवार व गाव परिसरात एकूण ३० ते ३२ प्राचीन मंदिरांचे ठिकाणे आणि अवशेष आढळले आहेत. याशिवाय वेगवेगळ्या स्वरूपात लहान, मध्यम आणि मोठ्या प्रमाणावर एकूण ३२ 'बेडे' सापडले आहेत. सरासरी वर्षाला ५ ते ६ असे नवीन प्रमाण सापडण्याचे दिसून येते. तसेच चांदीची नाणी ४, नेदरलँड्सच्या राणीची (इ.स. १८०० सालातील) एक साधी नाणी, पाषाणी विरगळ एकूण २१० आणि पाषाणी शिलालेख ३ आढळले आहेत. या सर्व घटना कसबा बीड गावाच्या वैभवात भर टाकतात, असे यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड संघटनेचे कार्यकर्ते सूरज तिबिले यांनी माहिती दिली आहे.

कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो, परंतु सापडणाऱ्या सुवर्ण मुद्रांचा एक न उलगडणारा कोडा आहे आणि इतिहास संशोधकांसाठी हा आव्हानात्मक विषय ठरला आहे. येथे सापडलेली बेडे गावस्थानींना दैवी देणगी व प्रसाद समजून घरातील देव्हाऱ्यात पूजा करतात. - राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती पंचायत समिती करवीर

Web Title: Gold coins are found in the rain of the deer constellation in Kasba Beed Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.