शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या उलाढालीत दोनशे कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २४) ऑनलाइन होत आहे. संघाची २०२०-२१ या आर्थिक वर्षात दोनशे कोटीने उलाढालीत वाढ झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यक्ष पाटील म्हणाले की, संघाची आर्थिक वर्षात २५५१ कोटी उलाढाल झाली असून, दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त ८३ कोटी ८१ लाख इतकी रक्कम दिली आहे. संघाने भोकरपाडा इंडस्ट्रीज येथे १६ एकर जागा खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ४४ कोटी रक्कम गुंतवणुकीचे नियोजन केले आहे. सध्या फक्त जमीन खरेदी करण्यात येणार असून, येत्या काही वर्षात पॅकींग स्टेशनची क्षमता अपुरी वाटल्यास त्यानंतर सदर जागेवर बांधकाम, मशिनरी उभारण्याचे नियोजन करण्यात येईल. या दोन्ही जागेच्या खरेदीसह पॅकींग स्टेशनच्या जागेवर बांधकाम व मशिनरीसाठी १३० कोटी ४० लाख खर्च अपेक्षित आहे. यावेळी संचालक अरुण डोंगळे, डॉ. सुजीत मिणचेकर, अजित नरके, प्रा. किसन चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, बाबासाहेब चाैगले, एस. आर. पाटील, कर्णसिंह गायकवाड, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सचिव एस. एम. पाटील आदी उपस्थित होते.

अहवालाचा लुक बदलला

‘गोकुळ’चा अहवाल नेहमीच दर्जेदार असतो. यंदा मात्र संचालक मंडळाने देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘ अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा...प्रवास अखंडित भारताचा’ यावर अहवालाचे मुखपृष्ठ बनवले आहे. आतील पानात दूध व दुग्धजन्य पदार्थांसह पशुखाद्याची ठळक जाहीरात केल्याचे दिसते.

म्हैस दूध ४८.४७ रुपये प्रतिलिटर उच्चांकी दर

‘गोकुळ’ दूध खरेदी दरात राज्यात अव्वल आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हैस दूध उत्पादकाला प्रतिलिटर ४८.४७ रुपये व गाय दूध उत्पादकांस ३०.८७ रुपये दर दिल्याची माहिती अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

लेखी प्रश्नांविनाच होणार सभा

सर्वसाधारण सभेवेळी काही सभासद लेखी प्रश्न उपस्थित करतात; मात्र पहिल्यांदाच एकही लेखी प्रश्न यावेळेला नाही. त्याचबरोबर ६२२५ संस्था सभासदांपैकी ४१९३ सभासदांना ऑनलाइन सहभागासाठी लिंक दिल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

नफ्यात १४.६३ लाखाने वाढ

संघाच्या नफ्यात २०१९-२० च्या तुलनेत १४ लाख ६३ हजारांची वाढ झाली आहे. संकलनातही ५ कोटी ६५ लाख ४४ हजार लिटरने वाढ झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

असा झाला उत्पन्नाचा खर्च-

निव्वळ नफा - ७ कोटी ६० लाख ८३ हजार

निव्वळ व्याज - १० कोटी ७६ लाख ५८ हजार

घसारा - ११ कोटी ७६ लाख ८५ हजार

व्यवस्थापन व वितरण खर्च - २४ कोटी १२ लाख २५ हजार

सेवक वर्ग खर्च - १३६ कोटी ९४ लाख ३७ हजार

संकलन, पशुखाद्य व दुग्धशाळा खर्च - २६७ कोटी ७० लाख ३४ हजार

दूध खरेदी व उत्पादकास सेवाप्रीत्यर्थ

आदा

- २१०३ कोटी १ लाख ५६ हजार

एकूण - २५६१ कोटी ९२ लाख ७८ हजार