शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पूर: गोकुळचे दूध संकलन बंद, महापुरामुळे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:23 IST

कोल्हापूर पूर: गोकुळकडून दररोज साडेनऊ ते दहा लाख लिटर दूधाचे संकलन होते.

कोल्हापूर : कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीला महापूर आला आहे. इतर नद्यांचे पाणी वेगात वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडचण येत असल्यामुळे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दमदार पावसाने जिल्ह्यातील पूर संकट सर्वदूर पसरल्याने राज्य, जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. 87 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचबरोबर, पावसामुळे रस्ते बंद झाल्याने जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी संघाना दूध संकलनाचा फटका बसला आहे. दूध वाहतुकीस अडचण होत असल्याने गोकुळने संकलन थांबविले आहे. 

गोकुळकडून दररोज साडेनऊ ते दहा लाख लिटर दूधाचे संकलन होते. पण गेल्या काही दिवसात पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने संकलनावर परिणाम झाला आहे. पर्यायी मार्गाने दूध संकलन करण्यात येत होते. मात्र, तेही आता पुरामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध संकलन बंद झाल्याने ग्रामीण भागात घरोघरी असलेल्या दुधाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांतील काही गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाRainपाऊसKolhapur Floodकोल्हापूर पूर