‘गोकुळ’ चा चारा वीट प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक  : रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:21 IST2018-12-07T16:20:17+5:302018-12-07T16:21:59+5:30

कोल्हापूर/गांधीनगर : ‘ गोकुळ’ चा ‘चारा वीट’ देशातील सहकारात पहिला प्रकल्प असून दर्जेदार उत्पादनाच्या बळावर हा प्रकल्प देशाच्या सहकाराला ...

Gokul's fodder project is a guide to the country's co-operative: Chariot | ‘गोकुळ’ चा चारा वीट प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक  : रथ

‘गोकुळ’ चा चारा वीट प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक  : रथ

ठळक मुद्दे‘गोकुळ’ चा चारा वीट प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक  : रथ‘अभिनव चारा वीट प्रकल्प’चे उदघाटन

कोल्हापूर/गांधीनगर : ‘गोकुळ’ चा ‘चारा वीट’ देशातील सहकारात पहिला प्रकल्प असून दर्जेदार उत्पादनाच्या बळावर हा प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक ठरेल. असे विश्वास एन. डी. डी. बी. चे अध्यक्ष दिलीप रथ यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या ‘अभिनव चारा वीट प्रकल्प’चे उदघाटन शुक्रवारी रथ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडीक होते.

महादेवराव महाडीक, ए. के. वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या कार्याचा आढावा घेतला.

ज्येष्ठ संचालक रविंद्र आपटे यांनी आभार मानले. माजी आमदार पी. एन. पाटील, ‘एन. डी. डी. बी.’चे अधिकारी अनिल हातेकर, डॉ. व्ही. श्रीधर व संचालक उपस्थित होते.
 

 

Web Title: Gokul's fodder project is a guide to the country's co-operative: Chariot