शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

'पौष्टिक' स्वस्ताई... गायीचं दूध झालं दोन रुपयांनी स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:49 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उद्या, गुरुवारपासून गाय दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकाला ३.५ फॅटसाठी प्रतिलिटर २३ तर कार्यक्षेत्राबाहेर उत्पादकाला १८ रुपये दर मिळणार आहे. संघाने खरेदीबरोबर विक्रीदरातही कपात करण्याचा निर्णय ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उद्या, गुरुवारपासून गाय दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकाला ३.५ फॅटसाठी प्रतिलिटर २३ तर कार्यक्षेत्राबाहेर उत्पादकाला १८ रुपये दर मिळणार आहे. संघाने खरेदीबरोबर विक्रीदरातही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई बाजारपेठेत गाईचे दूध ४४ वरून ४२ रुपये लिटर होणार आहे. पुणे, कोल्हापूरसह इतर बाजारपेठांतील सध्याच्या दरापेक्षा दोन रुपयांची कपात होणार आहे. त्याची अंमलबजावणी उद्या, गुरुवारपासून केली जाणार आहे.

गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने ‘गोकुळ’ने चार महिन्यांपूर्वी खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. उत्पादकांकडून ३.५ फॅटचे दूध २५ रुपयांनी संघ खरेदी करत होता. दूध पावडरच्या दरात वाढ होत नसल्याने संघाने पहिल्यांदा कार्यक्षेत्राबाहेर गाय दूधात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करून २० रुपयांनी दूध खरेदी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कार्यक्षेत्रातील खरेदी दरातही कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पण दूध उत्पादकांचे तीव्र पडसाद उमटतील, या भीतीने ‘गोकुळ’ने निर्णय लांबणीवर टाकला होता.

मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन कपातीचा निर्णय घेण्यात आला. पंधरा दिवसांत सीमाभागात दुसऱ्यांदा खरेदीदरात कपात केली आहे. सीमाभागातून आता प्रतिलिटर १८ रुपयांनी गाईचे दूध खरेदी केले जाणार आहे. कार्यक्षेत्रातील दूध खरेदी दरातही दोन रुपयांची कपात केली असून येथे २३ रुपयांनी खरेदी केली जाणार आहे.

अशी होणार वाढ -कार्यक्षेत्रातील दूधफॅट सध्याचा दर नवीन दर३.५ २५ रुपये २३ रुपयेकार्यक्षेत्राबाहेर दूध३.५ २० रुपये १८ रुपये 

गाईच्या अतिरिक्त दुधामुळे संघाचा तोटा होत असल्याने खासगी संघांनी खरेदीत प्रतिलिटर चार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आम्हालाही नाइलाजास्तव दोन रुपयांची कपात करावी लागत आहे.- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध