गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची लोकमतला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:18 IST2021-05-15T17:18:30+5:302021-05-15T17:18:57+5:30
GokulMilk Kolhapur : गोकुळचे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची लोकमतला भेट
कोल्हापूर : गोकुळचे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोकमतच्या वतीने वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पाटील म्हणाले, ह्यगोकुळह्णच्या निवडणूकीत दूध उत्पादकांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली. निवडणूकी दरम्यान आघाडीच्या वतीने दिलेली आश्वासने पुर्ततेसाठी प्रयत्न करणार आहे.
सध्या लॉकडाऊनचा कालावधी असल्याने दूधाचा उठाव थोडा कमी झाला आहे. तरीही दूध उत्पादकांना कोणत्याही परिस्थितीत दोन रूपये जादा दर दिला जाईल. यावेळी ह्यलोकमतह्णचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील, ह्यगोकुळह्णचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.