शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Gokul Milk Election : भारती डोंगळे, शिंपी, धुरे, नांदेकर, पी. जी. शिंदेंचे अर्ज अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 8:24 PM

GokulMilk Election Kolhapur-गोकुळ दूध संघासाठी सोमवारी झालेल्या छाननीत भारती विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, पी. जी. शिंदे, यशवंत नांदेकर आदी प्रमुखांचे अर्ज अवैध ठरले. संघाच्या पोटनियमानुसार दूध पुरवठ्यासह पशुखाद्याच्या अटींची पूर्तता न केल्याचा फटका दिग्गजांना बसला. छाननीत ४१ जणांचे अर्ज थेट अवैध ठरले तर ३५ जणांची सुनावणी घेऊन निर्णय होणार आहे, त्यामुळे ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारती डोंगळे, शिंपी, धुरे, नांदेकर, पी. जी. शिंदेंचे अर्ज अवैधपशुखाद्य, दूध पुरवठा अटीचा सर्वांचा झटका : ७६ जणांचे १०४ अर्ज बाद

कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी सोमवारी झालेल्या छाननीत भारती विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, पी. जी. शिंदे, यशवंत नांदेकर आदी प्रमुखांचे अर्ज अवैध ठरले. संघाच्या पोटनियमानुसार दूध पुरवठ्यासह पशुखाद्याच्या अटींची पूर्तता न केल्याचा फटका दिग्गजांना बसला. छाननीत ४१ जणांचे अर्ज थेट अवैध ठरले तर ३५ जणांची सुनावणी घेऊन निर्णय होणार आहे, त्यामुळे ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरण्याची शक्यता आहे.गोकुळच्या २१ जागांसाठी ४८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील व डॉ. गजेंद्र देशमुख यांनी छाननी प्रक्रिया सुरू केली. सुरुवातील सर्वसाधारण गटातील वैध अर्ज निश्चित करण्यात आले. त्यावर हरकत नोंदवण्याचे आवाहन केल्यानंतर अवैध अर्ज बाजूला काढले.

अवैध अर्जांबाबतही म्हणणे ऐकून घेतले. छाननीत ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरले, त्यापैकी ३५ जणांनी हरकत घेतली, त्यावर सुनावणी झाली असून आज, मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी निकाल देणार आहेत. सकाळी अकरा ते दुपारी दीडपर्यंत छाननी होऊन त्यानंतर सुनावणी घेण्यात आली. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर