कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त तब्बल १३६ कोटी ३ लाख रुपये फरक दिला असून, ही रक्कम उद्या, बुधवारी दूध संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. म्हैस उत्पादकांना प्रतिलिटर २.४५, तर गाय दूध उत्पादकांना १.४५ रुपये फरक मिळणार आहे. आतापर्यंतचा हा उच्चांकी दूध फरक असून, पहाटेपासून शेणामुतात राबणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने दिवाळीची पहाट उजाडत असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, प्रा. किसन चौगले, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, सुजीत मिणचेकर, एस. आर. पाटील, रणजीतसिंह पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.संघाचा अंतिम दूध दरफरकाची तुलनात्मक माहितीतपशील - २०२३-२४ - २०२४-२५ - गतसालापेक्षा जास्त
- अंतिम दूध दरफरक - ११३.६६ कोटी - १३६.०३ कोटी - २२.३७ कोटी
- दूध दरफरक (रोखीने) - ९३.३२ कोटी - १११.५१ कोटी - १८.१९ कोटी
- दरफरक वरील व्याज (६%) - ३.२० कोटी - ५.५२ कोटी - २.३२ कोटी
- डिबेंचर्स व्याज (७.८०%) - ८.९६ कोटी - १०.६७ कोटी - १.७१ कोटी
- डिव्हिडंड (११%) - ८.१६ कोटी - ८.३८ कोटी - ०.२२ कोटी
- वार्षिक उलाढाल - ३,६७० कोटी - ३,९६६ कोटी - २९६ कोटी
- व्यापारी नफा - २०८.०४ कोटी - २१५.८७ कोटी - ७.८३ कोटी
- ठेवी - २४८.३० कोटी - ५१२.५२ कोटी - २६४.२२ कोटी
Web Summary : Gokul Milk Union announces a record ₹136.03 crore Diwali bonus for Kolhapur milk producers, benefiting buffalo and cow milk suppliers. Funds disbursed to banks Wednesday.
Web Summary : गोकुल दूध संघ ने कोल्हापुर के दूध उत्पादकों के लिए 136.03 करोड़ रुपये के दिवाली बोनस की घोषणा की, जिससे भैंस और गाय के दूध आपूर्तिकर्ताओं को लाभ होगा। राशि बुधवार को बैंकों को वितरित की जाएगी।