राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मतदार यादीतील सुमारे १२०० दूध संस्था सभासदांवर हरकत घेतली आहे. पण पोटनियमानुसार संबधित संस्थेचे सभासद ठेवणे अगर रद्द करण्याचा अधिकार ‘गोकुळ’ला आहे. त्यात विद्यमान संचालकांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासद म्हणून पात्र राहण्यास आवश्यक असलेली वार्षिक २४० लिटर किंवा प्रतिदिनी ५० लिटर दुधाची अट शिथिल केल्याने कमी संकलन असलेल्या संस्थांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघावरील सत्तेसाठी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चढाओढ असते. संघाच्या २०२१ च्या निवडणुकीत सत्तांतरानंतर गेल्या पाच वर्षांत संघाचे दूध वाढले आहे. त्यानुसार प्राथमिक दूध संस्थांची संख्याही वाढली आहे. सध्या संघाच्या निवडणुकीची तयारी म्हणून प्रारूप याद्यांची प्रक्रिया सुरू आहे.
वाचा: ‘गोकुळ’ठरावासाठी मुश्रीफ यांच्याकडून जोडण्या, जास्तीत जास्त ठराव गोळा करण्याच्या सूचना‘गोकुळ’ने ५४७० संस्था सभासदांची यादी सहायक निबंधक (दुग्ध) कडे पाठविली आहे. या यादीतील १२०० संस्थांवर हरकत घेतल्याने संबंधित संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे. पण दोन वर्षांपूर्वीच सत्तारूढ गटाने सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी ५० लिटर दुधाची अट शिथिल केल्याने यातील बहुतांशी संस्थांना दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे.
निबंधकांकडे फक्त संस्थांच्या अस्तित्वाबाबत निर्णयदुग्ध निबंधक हे केवळ त्यांच्याकडील अपेंडेक्सला संस्था अस्तित्वात आहे का, एवढेच पाहू शकतात. अवसायनात निघालेले व नोंदणी रद्द झालेल्या संस्था मतदार यादीत असतील त्या काढून टाकण्याचा अधिकार दुग्ध निबंधकांना आहे.
कलम ३५ अन्वये ‘गोकुळ’ सभासद रद्द करण्याची प्रक्रिया
- संचालक मंडळाच्या बैठकीत संस्था सभासद रद्दचा ठराव करणे
- संबधित संस्थेला एक महिन्याची नोटीस लागू करणे
- सभासद रद्द करण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेची तारीख, वेळ, ठिकाण कळविणे
- नोटिसीमध्ये सभासद रद्द का करत आहे, या कारणाचा स्पष्ट उल्लेख आवश्यक
- सभेत किती विरुद्ध, किती मतांनी ठराव मंजूर, याचा उल्लेख करावा
- सभेने मंजूर केलेला प्रस्ताव विभागीय उपनिबंधक (दुग्ध) कडे पाठविणे
- निबंधकांनी संबधित संस्थेला नोटीस काढून म्हणणे ऐकून घेऊन निर्णय देणे
या चार कारणाने सभासदत्व रद्द होऊ शकते
- कलम ३५ अन्वये सभासद रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी लागते
- संस्थाने स्वत:हून सभासदत्वाचा राजीनामा देणे
- निबंधक विभागाने अवसायनात काढल्यास
- निबंधक विभागाने नोंदणी रद्द केल्यास
Web Summary : Gokul retains the right to cancel milk union memberships. Relaxed milk collection norms offer relief to many societies facing eligibility concerns for election. Registrar decides on the existence of the organization. Four reasons can lead to membership cancellation.
Web Summary : 'गोकुल' के पास सदस्यता रद्द करने का अधिकार बरकरार है। दूध संग्रह मानदंडों में ढील से चुनाव के लिए पात्रता संबंधी चिंताओं का सामना कर रहे कई समितियों को राहत मिली है। रजिस्ट्रार संगठन के अस्तित्व पर निर्णय लेता है। सदस्यता रद्द होने के चार कारण हो सकते हैं।