‘गोकुळ’ गाठीभेटी फोटो ओळी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:55+5:302021-04-05T04:21:55+5:30

१) राष्ट्रवादीच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट ...

‘Gokul’ Gathibheti photo lines .... | ‘गोकुळ’ गाठीभेटी फोटो ओळी....

‘गोकुळ’ गाठीभेटी फोटो ओळी....

१) राष्ट्रवादीच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट घेतली. (फोटो-०४०४२०२१-कोल-गोकुळ)

२) दादांचा षटकार...... माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या भूमिकेला महत्त्व असून, कोणत्याही निवडणुकीत आवाडे घराणे केंद्रबिंदू असते. ‘गोकुळ’च्या राजकारणात त्यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केल्याने दोन्ही आघाड्यांसमोर पेच निर्माण झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या निवासस्थानी रविवारी भेट दिली. यावेळी आवाडे दादांनी दोन्ही हात वर करून दोन्ही नेत्यांना बुचकळ्यात टाकले. (फोटो-०४०४२०२१-कोल-गोकुळ ०१)

३) मुश्रीफ यांनी घेतले रत्नाबाई शेट्टींचे आशीर्वाद......माजी खासदार राजू शेट्टी हे पंढरपूर पोटनिवडणूक प्रचारात असल्याने मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी शिरोळ दौऱ्यावर असताना शेट्टी यांच्या घरी भेट दिली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी शेट्टी यांच्या मातोश्री रत्नाबाई यांचे आशीर्वाद घेतले. (फोटो-०४०४२०२१-कोल-गोकुळ ०२)

४) दोन्ही मंत्र्यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांची भेट घेतली. (फोटो-०४०४२०२१-कोल-गोकुळ ०३)

५) दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची कारखाना कार्यस्थळावर जाऊन मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांनी भेट घेतली. (फोटो-०४०४२०२१-कोल-गोकुळ ०४)

६) आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी जाऊन मंत्र्यांनी भेट घेतली. (फोटो-०४०४२०२१-कोल-गोकुळ ०५)

७) इचलकरंजी येथे आमदार राजू आवळे यांची भेट घेतली. (फोटो-०४०४२०२१-कोल-गोकुळ ०६)

Web Title: ‘Gokul’ Gathibheti photo lines ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.