शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

देवही बनले शाकाहारी

By admin | Updated: December 16, 2014 23:49 IST

मांसाहारी यात्रांना सुटी : अनिष्ट प्रथा, परंपरांना मूठमाती

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -परिवर्तनाचा ध्यास घेतलेली उचगाव (ता. करवीर) येथील पारधी समाजाची वसाहत. एकेकाळी अनिष्ट प्रथा आणि परंपरांच्या जोखडात अडकलेला हा समाज. मात्र, या वसाहतीतील समाज बांधवांनी लग्न आणि मृत्यूनंतरच्या जाचक रूढी, प्रथा आणि परंपरांना मूठमाती दिली आहे. एवढेच नव्हे, तर वर्षातून चारवेळा देवांच्या यात्रा व्हायच्या. त्याची संख्या आता एका यात्रेवर आणली आहे. यात्रेत देवाला दिला जाणारा मांसाहारी नैवेद्य बंद करून शाकाहारी यात्रा करण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणणारी ही पारधी समाजातीलच नव्हे, तर सर्व समाजातील एकमेव वसाहत असावी.या वसाहतीमध्ये वर्षाला कमीत-कमी चार देवांची यात्रा केली जात होती. यात्रेत कोंबडी, बकऱ्यांचा बळी दिला जात होता. प्रत्येक कुटुंबावर यात्रेचा आर्थिक भार पडत होता. मिळविलेले सर्व यात्रेत गमावण्याची वेळ आली. त्यामुळे वसाहतीमध्ये वर्षातून एकदाच शाकाहारी यात्रा करण्याचा निर्णय उचगावचे माजी सरपंच, या समाजाचे मार्गदर्शक गणेश काळे याच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून येथे दुर्गामाताची यात्रा शाहाकारी होत आहे. एकत्रितपणे महाप्रसादाचे वाटप केले जाते. परिणामी खर्चातही बचत होत आहे. अनिष्ट प्रथा-परंपरांना मूठमाती देतानाच समाजाला व्यसनाधिनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. नशाबंदी, गुटखाबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. वर्गणी गोळा न करता गणेशोत्सवकोणाकडूनही वर्गणी गोळा न करता प्रत्येकवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. वायफळ खर्च आणि डॉल्बीला फाटा देऊन हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.मुधोळ संस्थानातून आलेल्या समाजाला सुरुवातीला अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी संघर्ष करावा लागला. चुकीच्या प्रथा, परंपरा बाजूला सारून समाजाला व्यसनाधिनतेच्या विळख्यातून बाजूला काढले. समाजातील काही लोकांमुळे पडलेला गुन्हेगारीचा डाग पुसून लोकसहभागातून एक आदर्श वसाहत निर्माण करण्याचे स्वप्न आहे. समाजातील प्रत्येक कुटुंंब सुखी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - गणेश काळे, मार्गदर्शक वमाजी सरपंच, उचगाव