गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार

By उद्धव गोडसे | Published: November 23, 2023 08:32 AM2023-11-23T08:32:53+5:302023-11-23T08:39:43+5:30

नीलू गौतम ( वय ४३), रिद्धिमा गौतम (वय १७) आणि  सार्थक गौतम (वय १३) अशी मृतांची नावे आहेत.

Goa-Mumbai travel accident near Kolhapur; Three members of the same family were killed in an accident around 2 am | गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार

कोल्हापूर : गोव्याहून मुंबईला जाणारी व्हीआरएल ट्रॅव्हल्स गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडी येथे उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांना दुर्दैवी मृत्यू झाला. नीलू गौतम ( वय ४३), रिद्धिमा गौतम (वय १७) आणि  सार्थक गौतम (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. तर चौघेजण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, व्हीआरएल कंपनीची मुंबईला जाणारी खाजगी स्लीपर कोच बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ पुईखडी येथे भरधाव बस उलटली. अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि करवीर पोलिस घटनास्थळी पोहोचले. 

तातडीने बचाव कार्य राबवून जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवले. बसखाली अडकल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये २५ प्रवाशी होते अशी माहिती अग्नी शामक दलाच्या जवानांनी दिली. चिफ फायर ऑफिसर मनीष रणभिसे, फायरमन प्रमोद मोरे, सौरभ पाटील, चेतन जानवेकर, युवराज लाड , प्रभाकर खेबूडे, अमित जाधव,  योगेश जाधव , संजय पाटील यांनी बचावकार्य राबवले.

Web Title: Goa-Mumbai travel accident near Kolhapur; Three members of the same family were killed in an accident around 2 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.