खडकेवाडा येथे कोरोना योद्ध्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:36+5:302021-06-09T04:30:36+5:30
खडकेवाडा (ता.कागल) येथे गाव कोरोनामुक्त बनविण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा संकल्प परिवर्तन ग्रुपच्या वतीने ...

खडकेवाडा येथे कोरोना योद्ध्यांचा गौरव
खडकेवाडा (ता.कागल) येथे गाव कोरोनामुक्त बनविण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा संकल्प परिवर्तन ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रा. पं. सदस्य कॉ. बाबू मेटकर, विजय घोरपडे यांना सामाजिक कार्याची दखल घेत शाल, श्रीफळ आणि रोप देऊन गौरवण्यात आले. परिवर्तन ग्रुपच्या वतीने आरोग्य विभागास दोन ऑक्सिमीटर देण्यात आले.
सरपंच रेश्मा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आप्पासाहेब पवार, ग्रा.पं. सदस्य योगेश साबळे, माजी ग्रा.पं.सदस्य दत्ता घोरपडे, तानाजी कोराणे, नियाज देसाई, विशाल निंबाळकर, सुशांत खोत, संजय चिंगळे, दादासाहेब कांबळे, बाळासाहेब कांबळे, शामराव कांबळे, नारायण कांबळे, संदीप कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वासुदेव कांबळे यांनी केले, तर प्रवीण कांबळे यांनी आभार मानले.
दरम्यान, यावेळी कोरोनाकाळात योगदान देणारे स्थानिक डॉक्टर, आरोग्य सेवक सेविका, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील यांच्यासह कोरोना कमिटी आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात आला.