शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST

शिरोली : शिरोलीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी महाडिक गटाच्यावतीने गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात ...

शिरोली : शिरोलीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी महाडिक गटाच्यावतीने गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मोकाशी यांनी, लवकरच नवीन कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देऊ, असे आश्वासन दिले.

गेल्या तीन वर्षांत शिरोली ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळाला नसल्याने विकासकामे खोळंबली. अभ्यासू ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांनाच मुदतवाढ मिळावी, यासाठी शाहू आघाडीने प्रयत्न केले; मात्र कठारे यांची नागावमध्ये बदली झाली. त्यानंतर एम. आर. पाटील यांनी पदभार स्वीकारला; मात्र त्यांच्या कार्यप्रणालीवर आघाडी नाराज होती. अशोक मुसळे यांनी काही दिवस पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेत सत्तांतर होताच आघाडीने पुन्हा कठारे यांना आणले;

मात्र एकाच अधिकाऱ्याची पुन्हा त्याच ग्रामपंचायतीत नेमणूक करता येत नसल्याने कठारे यांची प्रशासनाने बदली केली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आर. सी. पाटील यांनी पदभार स्वीकारला. मात्र, त्यांनीही रजा टाकून बदलीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या तीन वर्षांत पाच ग्रामविकास अधिकारी आले आणि गेले. यामुळे गावातील सुरू असलेल्या विकास कामांना "खो" बसला आहे. तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिरोली ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा अशी मागणी महाडिक गटाचे ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे‌, सलीम महात, बाबासाहेब कांबळे, विनायक कुंभार, पुष्पा पाटील, मीनाक्षी खटाळे, संध्याराणी कुरणे, श्वेता गुरव यांनी केली.