पक्षाचे काम करणाऱ्यांना कमिट्यांवर नेमावे, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 04:15 PM2020-02-08T16:15:32+5:302020-02-08T16:26:18+5:30

मागच्या काळात कमिट्या दिल्या नाहीत, त्याची पुनरावृत्ती यावेळी व्हायला नको, तातडीने कार्यकर्त्यांना कमिट्यांवर नेमावे, अशी आग्रही मागणी शनिवारी झालेल्या कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी केली.

Give nomination to party workers, demand at NCP's rally | पक्षाचे काम करणाऱ्यांना कमिट्यांवर नेमावे, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मागणी

पक्षाचे काम करणाऱ्यांना कमिट्यांवर नेमावे, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मागणी

Next
ठळक मुद्देपक्षाचे काम करणाऱ्यांना उमेदवारी द्या, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मागणीकोल्हापूर महानगरपालिकेची आॅक्टोबर महिन्यात निवडणूक

कोल्हापूर : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात पंधरा वर्षांत कोणत्या कमिट्या असतात हेसुद्धा कळले नाही, परंतु मागच्या पाच वर्षांत त्या कळाल्या, असा खोचक टोला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मारला. मागच्या काळात कमिट्या दिल्या नाहीत, त्याची पुनरावृत्ती यावेळी व्हायला नको, तातडीने कार्यकर्त्यांना कमिट्यांवर नेमावे, अशी आग्रही मागणी शनिवारी झालेल्या कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी केली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार होते.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक जुने व ज्येष्ठ कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात पंधरा वर्षांत कोणत्या कमिट्या असतात हेसुद्धा कळले नाही, परंतु मागच्या पाच वर्षांत त्या कळाल्या, असा खोचक टोला अजित राऊत यांनी मारला. मागच्या काळात कमिट्या दिल्या नाहीत, त्याची पुनरावृत्ती यावेळी व्हायला नको, तातडीने कार्यकर्त्यांना कमिट्यांवर नेमावे, अशी सूचना आदिल फरास यांनी केली.

मागच्या निवडणुकीत आपापसातील राजकारण आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे पक्षाच्या २२ उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला. तसे न करता जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन नगरसेवक अजित राऊत यांनी केले. 

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक सुद्धा समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमधून घ्यावा. प्रत्येकवेळी टोप्या बदलणाऱ्या लोकांना स्वीकृत नगरसेवक करू नका, आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा अनिल घाडगे यांनी दिला.

निवडणुकीत युवकांना प्राधान्य देण्याची सूचना महेंद्र चव्हाण यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक आदिल फरास, अमोल माने, प्रकाश पाटील, निरंजन कदम, अनिल कदम, प्रकाश पाटील-सरवडेकर, आप्पासाहेब बेडगकर, शीतल तिवडे यांनी सूचना केल्या. माजी नगरसेवक रामदास भाले यांनी आभार मानले. यावेळी नंदकुमार मोरे, संभाजी देवणे, अनिल आवळे, संजय कुराडे, संजय पडवळे, सुहास साळोखे उपस्थित होते.



 

 

Web Title: Give nomination to party workers, demand at NCP's rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.