त्या दुकानाचा परवाना सैनिक फौंडेशनला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:25 IST2020-12-08T14:23:26+5:302020-12-08T14:25:33+5:30
Tahasildar, kolhapurnews बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील श्री लक्ष्मी विकास सेवा संस्था या रास्तभाव दुकानाचा परवाना आजी-माजी सैनिक वेल्फेअर फौंडेशनला द्या, अशी मागणी फौंडेशनचे अध्यक्ष वसंत गवळी यांनी तहसिलदार दिनेश पारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

गडहिंग्लज येथे तहसिलदार दिनेश पारगे यांना निवेदन देताना वसंत गवळी, प्रताप चव्हाण, सुभाष मणिकेरी, कुमार पाटील, भारत चौगुले, संदीप नाथबुवा आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज :बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील श्री लक्ष्मी विकास सेवा संस्था या रास्तभाव दुकानाचा परवाना आजी-माजी सैनिक वेल्फेअर फौंडेशनला द्या, अशी मागणी फौंडेशनचे अध्यक्ष वसंत गवळी यांनी तहसिलदार दिनेश पारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात, रास्त धान्य वाटपात केलेल्या गैरप्रकारामुळे संस्थेचा ६ महिन्यासाठी परवाना रद्द करण्यात आला आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सहा महिन्यानंतर पुन्हा त्याच दुकानाला रास्त भाव वाटप करण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र, गैरप्रकार घडण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत याची खात्री नाही.
आजी-माजी सैनिक संघटनेला दुकानाचा परवाना दिल्यास निवृत्त सैनिकांना रोजगारासह न्यायाने व काटेकोरपणे धान्य वाटप करता येईल. यावेळी फौंडेशनचे उपाध्यक्ष प्रताप चव्हाण, सचिव सुभाष मणिकेरी, शंकर चौगुले, शिवलिंग धुळाण्णावर, आनंद नांगनुरे, भारत चौगुले, कुमार पाटील, संदीप नाथबुवा आदी उपस्थित होते.