शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या, आमदार पी.एन.पाटील यांची विधानसभेत मागणी

By विश्वास पाटील | Published: December 15, 2023 1:05 PM

एक व्यक्ती मराठा समाजाला जिवंत असेपर्यंत आरक्षण देणार नसल्याची वल्गना करतोय. त्या माणसावर काय कारवाई करणार आहे की नाही?

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वच आमदारांचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्र्यांनीही आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. मग अडचण कुठे आहे? सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे सरकारने कायद्याचे तज्ज्ञ, वकील यांच्याशी चर्चा करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मार्ग काढावा. पण समाजाला टिकेल असे आरक्षण द्यावे, अशी मागणी करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली.सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनात आमदार पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर  भूमिका मांडत त्वरित निर्णय घेण्याची विनंती सरकारला केली. आमदार पाटील म्हणाले, मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले, जगाने त्याची नोंद घेतली. इतके शांततेत मोर्चे काढल्यानंतर आता याला वेगळे वळण लागत आहे याचा सरकारने विचार करावा.मनोज जरांगे प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहेत. प्रत्येक गावागावातील वेशीवर फलक लावले आहेत. नेत्यांना गावबंदी केली आहे. दुसऱ्या समाजातील ६० टक्के गुण असणाऱ्या मुलांना प्रवेश मिळतो. पण,  मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण मिळूनही चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही.  बी.कॉम असूनही अनेक मुले कामगार म्हणून करतात. त्यांना कार्यालयात काम मिळत नाही. सगळ्यांना आरक्षण दिले पण मराठा समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे.  त्यामुळे सर्वसामान्य माणूस भडकला आहे. यासाठी सरकारने कोणत्याही परस्थितीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे. त्यांच्यावर कारवाई कधी करणारआज सगळा महाराष्ट्र एकत्र आहे. आमदार-खासदार एकत्र आहेत. पण, एक व्यक्ती मराठा समाजाला जिवंत असेपर्यंत आरक्षण देणार नसल्याची वल्गना करतोय. त्या माणसावर काय कारवाई करणार आहे की नाही. सरकार त्यावर काही निर्णय घेणार आहे की नाही असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणP. N. Patilपी. एन. पाटील