सीएचबीधारकांना मुदतवाढ द्या, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:41 IST2020-08-25T18:38:59+5:302020-08-25T18:41:22+5:30
महाविद्यालयांतील गेल्यावर्षीच्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना (सीएचबीधारक) मुदतवाढ द्यावी; ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन करावे; प्रलंबित असणारे निकाल तातडीने जाहीर करावेत, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनने मंगळवारी केल्या.

सीएचबीधारकांना मुदतवाढ द्या, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनची मागणी
कोल्हापूर : महाविद्यालयांतील गेल्यावर्षीच्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना (सीएचबीधारक) मुदतवाढ द्यावी; ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन करावे; प्रलंबित असणारे निकाल तातडीने जाहीर करावेत, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनने मंगळवारी केल्या. याबाबत असोसिएशनच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी चर्चा केली.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये ६० टक्के प्राध्यापक हे सीएचबीधारक आहेत. कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत सीएचबीधारकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण शक्य होणार नाही. त्यामुळे गेल्या वर्षी महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या सीएचबीधारकांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
यावेळी प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, डी. आर. मोरे, सुरेश गवळी, युवराज भोसले, प्रवीण चौगुले, मंगलकुमार पाटील, नंदकुमार शहा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी परीक्षा नियंत्रक गजानन पळसे, आदी उपस्थित होते.