दिव्यांगांना अंत्योदय रेशनकार्ड द्या *
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:55+5:302021-02-05T07:02:55+5:30
शिरोळ : दिव्यांगांना अंत्योदय रेशनकार्ड मिळावे यासह विविध मागण्यांप्रश्नी शिरोळ तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे ...

दिव्यांगांना अंत्योदय रेशनकार्ड द्या *
शिरोळ : दिव्यांगांना अंत्योदय रेशनकार्ड मिळावे यासह विविध मागण्यांप्रश्नी शिरोळ तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, अंत्योदय रेशनकार्डबाबत इष्टांक मंजूर नाही. त्यामुळे दिव्यांगांचे अर्ज द्यावेत, प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. पेन्शन लाभ घेताना येणाऱ्या अडचणींबाबत संबंधित बँकांना सूचना देऊ, असे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शिरोळ तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळावे. तहसील कार्यालयाकडून दोन महिने संजय गांधी पेन्शन रक्कम मिळत नाही. नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला मिळाली पाहिजे. शिवाय, केडीसीसी बँक दुसऱ्या मजल्यावर असल्याने दिव्यांगांना पेन्शन रकमेसाठी त्रास होतो. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील दिव्यांगांना एटीएम कार्ड मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनाचे नेतृत्व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सईद पिरजादे, प्रदीप आयगोळे, अनिल देशमुख, सिद्राम राजमाने, सुनीता पाटील, रूकय्या केरुरे यांनी केले. यावेळी यमन्नाप्पा पाथरवट ,चंद्रगुप्त मगदूम, सादिक बागवान, कलंदर मकानदार, बंडा परीट, नारायण लोखंडे, सुधाकर तावदारे, रसुल पाथरवट, महादेव तलवार, शरद कोरे, संजय मेंगे, दिलावर घुणके, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - २९०१२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथे प्रहार अपंग संघटनेच्यावतीने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले.