शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा;  झारखंड, हरियाणा उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:36 AM

सुमती कुमारी, अस्थॉम ओरॉन, कुवारी इंदवर यांच्या गोलच्या जोरावर झारखंड फुटबॉल असोसिएशनने बलाढ्य मणिपूर फुटबॉल असोसिएशनचा; तर हरियाणा फुटबॉल असोसिएशनने गतविजेत्या तमिळनाडू फुटबॉल असोसिएशनचा ४-० असा पराभव करीत हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

ठळक मुद्देहिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धागतविजेते तमिळनाडू, मणिपूरचे आव्हान संपुष्टात

कोल्हापूर : सुमती कुमारी, अस्थॉम ओरॉन, कुवारी इंदवर यांच्या गोलच्या जोरावर झारखंड फुटबॉल असोसिएशनने बलाढ्य मणिपूर फुटबॉल असोसिएशनचा; तर हरियाणा फुटबॉल असोसिएशनने गतविजेत्या तमिळनाडू फुटबॉल असोसिएशनचा ४-० असा पराभव करीत हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी सकाळच्या सत्रात झारखंड व मणिपूर फुटबॉल असोसिएशनच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. सामन्यांच्या प्रारंभापासून झारखंड संघाकडून अमिषा, सलिनाकुमारी, अस्थॉम ओरॉन, सुमती कुमारी यांनी आक्रमक वेगवान चाली रचल्या.

यात दुसऱ्याच मिनिटाला झारखंड संघास यश मिळाले. त्यांच्या कुवारी इंदवरने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर २९ व्या मिनिटाला सुमती कुमारी हिने गोल करीत ही आघाडी २-० अशी भक्कम केली. उत्तरार्धात ४८ व्या मिनिटास अस्थाम ओरॉन हिने गोल करीत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना सुमती कुमारी हिने गोल करीत संघाची आघाडी ४-० अशी भक्कम करीत संघास विजय मिळवून दिला. मणिपूरकडून एस. लिंडाकोम, हेमाम सिल्की, ठोकचाँग मार्टिना, गाशीपमदेवी, शांघोल देवी यांनीही चांगला खेळ केला; मात्र, झारखंडच्या आक्रमक खेळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या तमिळनाडू फुटबॉल असोसिएशनच्या संघास हरियाणा फुटबॉल असोसिएशनकडून ४-० असा पराभवाचा धक्का बसला. हरियाणाकडून ३१ व्या मिनिटास बाली हिने गोल करीत संघाचे खाते उघडले. सामन्यात बरोबरी साधण्याचे तमिळनाडूकडून जोरदार प्रयत्न झाले.

तमिळनाडूच्या मरिमा, प्रियदर्शनी, पुजी यांनीही आक्रमक व वेगवान चाली रचल्या; मात्र, त्यांना बरोबरी साधता आली नाही. उत्तरार्धात हरियाणाकडून ममता हिने ४९ व्या मिनिटास गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६४ व ९० व्या मिनिटानंतरच्या जादा वेळेत गोल करीत संघाची आघाडी ४-० अशी भक्कम करीत संघास विजयासह उपांत्य फेरीत पोहोचविले.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर