बांबरवाडी येथे मुलीचा गळफास लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:55+5:302021-02-12T04:23:55+5:30

पन्हाळा : बांबरवाडी (ता. पन्हाळा) येथे चौथीमध्ये शिकणाऱ्या आर्या (वय ११) हिचा खेळता-खेळता गळफास लागल्याने मृत्यू झाला. आईवडील बाहेर ...

Girl dies of strangulation at Bambarwadi | बांबरवाडी येथे मुलीचा गळफास लागून मृत्यू

बांबरवाडी येथे मुलीचा गळफास लागून मृत्यू

googlenewsNext

पन्हाळा : बांबरवाडी (ता. पन्हाळा) येथे चौथीमध्ये शिकणाऱ्या आर्या (वय ११) हिचा खेळता-खेळता गळफास लागल्याने मृत्यू झाला. आईवडील बाहेर गेले असताना हा अपघात घडला. चिमुकल्या मुलीचा हकनाक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आर्या संतोष मोरादकरचे आई, वडील हॉटेल चालवतात, तसेच ते केकपण बनवून देतात. गुरुवारी दिवसभर काही खरेदीसाठी हे दोघे कोल्हापूर येथे गेले होते. त्यामुळे आर्या व तिची लहान बहीण घरीच होते. दुपारी आर्या आपल्या लहान बहिणीला घेऊन जवळच असलेल्या मामाच्या घरी गेली. पण, थोड्याच वेळात ती एकटीच घरी गेली. तिची आई घरी आली असता दार उघडेना म्हणून पर्यायी मार्गाने घरी प्रवेश केल्यानंतर आर्याला ओढणीचा फास लागल्याचे लक्षात आले. तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता मृत म्हणून घोषित करण्यात आले.

Web Title: Girl dies of strangulation at Bambarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.