शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश प्रक्रियेसाठीचे विविध दाखले मिळवा असे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 14:07 IST

दहावीचा निकाल जाहीर झाल्याने आणि बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने विविध महाविद्यालये, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते. ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रक्रिया, आदींची माहिती ‘लोकमत’ने विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रियेसाठीचे विविध दाखले मिळवा असेआवश्यक कागदपत्रे; विद्यार्थी, पालकांसाठी माहिती

कोल्हापूर : दहावीचा निकाल जाहीर झाल्याने आणि बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने विविध महाविद्यालये, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते. ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रक्रिया, आदींची माहिती ‘लोकमत’ने विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

जातीचा दाखला

  • ओबीसी, मराठा प्रवर्ग 

आवश्यक कागदपत्रे :

  1.  घराण्यातील ज्याचा सन १९६७ पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.
  2. सन १९६७ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६७ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा).
  3.  रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र. 
  • विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (एसबीसी, व्हीजेएनटी) 
  1. घराण्यातील ज्याचा सन १९६१ पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.
  2.  सन १९६१ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६१ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा).
  3. रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र. 
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एस.सी., एस.टी.) 
  1. घराण्यातील ज्याचा सन १९५० पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.
  2. सन १९५० पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९५० पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा).
  3. रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र. 

या दाखल्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सन १९६७, १९६१ आणि १९५० ही वर्ष मानीव दिनांक पुरावा ग्राह्य धरले आहेत. या दिनांकांपूर्वी जो रहिवास पुरावा असेल. त्या संबंधित तहसील कार्यालयातील महा ई-सेवा केंद्रात अर्ज जमा करावा. (उदा. सातबारा अथवा घरठाण पत्रक जर, दुसऱ्या तालुक्यातील असेल आणि सध्या अर्जदार हा कोल्हापुरात राहत असेल, तर अर्जदारास सातबारा अथवा घरठाण पत्रक असलेल्या तालुक्यात अर्ज करावा लागतो.) हा दाखला मिळण्याची कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील मुदत ४५ दिवसांची, तर संपूर्ण राज्यात १५ दिवसांची मुदत आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर संंबंधित नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत कार्यालयातील कार्यवाही, पडताळणी होऊन डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर महा ई-सेवा केंद्रातून जातीचा दाखला मिळतो.

  • नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट (उच्च उत्पन्न गटात नसल्याबाबतचा दाखला) :

आवश्यक कागदपत्रे

  1. जातीचा दाखला
  2. आठ लाखांच्या आतील उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र

या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.

  •  उत्पन्नाचा दाखला

आवश्यक कागदपत्रे

  1. उत्पन्नाचा तलाठ्यांचा दाखला, शहरातील असल्यास कसबा करवीर तलाठी कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला
  2. नोकरी असल्यास (आयकर विवरणपत्र)
  3. शेती असल्यास (सातबारा)
  4.  रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र

या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.

  • डोमिसिअल (वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्वचा दाखला)
  1. मूळ महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3.  १५ वर्षांचा रहिवास सिद्ध करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे (वीज बिल, असेसमेंट उतारा, सातबारा, आदी)
  4.  रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.

या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्राकडे अर्ज करावा. संबंधित दाखल मिळण्याची मुदत १५ दिवस आहे.

या दाखल्यासाठी लागते प्रतिज्ञापत्रजातीचा दाखला आणि नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र (आॅफिडेव्हिट), तर उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसिअलसाठी स्व:घोषणापत्र (सेल्फ डिक्लरेशन) द्यावे लागते. त्याबाबतची प्रक्रिया महा ई-सेवा केंद्रात होते.शेतकरी, डोंगरी दाखल्यासाठीची कागदपत्रेवैद्यकीय शिक्षणासाठी शेतकरी दाखला आणि डोंगरी दाखला, तर कृषी शिक्षणासाठी शेतकरी दाखला लागतो. शेतकरी दाखल्यासाठी सातबारा, ‘८-अ’ उतारा, रेशनकार्ड, आधारकार्ड, मंडल अधिकारी अहवाल (पीक कोणते, शेती अथवा पडीक जमीन, आदींबाबतची माहिती), आॅफिडेव्हिट लागते. डोंगरी दाखल्यासाठी ‘डोमेसिअल’प्रमाणे कागदपत्रे लागतात. हातकणंगले, शिरोळ तालुका वगळून इतर सर्व तालुक्यांतील लाभार्थी या दाखल्याचा लाभ घेऊ शकतात. या दाखल्यासाठी लाभार्थी हा पूर्णपणे त्या तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. या दोन्ही दाखल्यांसाठी अर्जदाराचे एक छायाचित्र लागते.

विद्यार्थी आणि पालकांनी गुणपत्रिका मिळण्यापूर्वी आणि प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती महा ई-सेवा केंद्रातून घ्यावे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दाखले, प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अर्ज केल्यास एकाच वेळी प्रशासकीय यंत्रणेवर भार वाढतो. ते टाळण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी योग्य नियोजन करावे. या दाखल्यांसाठी महा ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार या पोर्टलद्वारे आॅनलाईन अर्ज करता येतो.-पिराजी संकपाळ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा महा ई-सेवा केंद्र चालक संघटना 

 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रkolhapurकोल्हापूर