शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगी कर्ज काढू...पण लग्न जोरदार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:38 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकुलती एक मुलगी आहे...लग्न एकदाच होतंय... ते धूमधडाक्यात झाले पाहिजे....‘त्यामुळे प्रसंगी कर्ज काढू पण लग्न जोरदार करू...’अशा मानसिकतेमुळे सामुदायिक विवाहाबद्दल जिल्ह्यात अनास्था असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत फक्त ६३ विवाह झाले असून अनेकवेळा यासाठी आलेला निधी पूर्णपणे खर्च न होता तो परत गेला ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकुलती एक मुलगी आहे...लग्न एकदाच होतंय... ते धूमधडाक्यात झाले पाहिजे....‘त्यामुळे प्रसंगी कर्ज काढू पण लग्न जोरदार करू...’अशा मानसिकतेमुळे सामुदायिक विवाहाबद्दल जिल्ह्यात अनास्था असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत फक्त ६३ विवाह झाले असून अनेकवेळा यासाठी आलेला निधी पूर्णपणे खर्च न होता तो परत गेला आहे.शेतकºयांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामुदायिक विवाहासाठी ‘शुभमंगल सामुहिक विवाह योजना’ शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेत गेल्या पाच वर्षांत फक्त ६३ सामुदायिक विवाह झाले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून होणाºया प्रबोधनाला कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्याचबरोबर यासाठी काम करणाºया सामाजिक संस्थांनाही हाच अनुभव येत आहे. त्यामुळे सन २०१२-१३ मध्ये झालेले २९ सामुदायिक विवाह प्रत्येक वर्षी वाढण्याऐवजी कमीच होत आले आहेत. अनेकवेळा तर मिळालेल्या अनुदानाच्या तुलनेत विवाह न झाल्याने उर्वरित निधी शासनाला परत गेला आहे. गतवर्षी तर फक्त दहाच विवाह झाले. याउलट मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद मिळत आहे. कारण या ठिकाणी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जादा आहे. यंदा २०१७-१८मध्ये सामुदायिक विवाहासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पाच लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामध्ये किमान ४० जोडप्यांचे विवाह होऊ शकतात; परंतु यासाठी लोक पुढे येण्यास तयार नाहीत. ‘प्रसंगी कर्ज काढू पण आपल्या पोराच लग्न जोरदार करू,’ अशा मानसिकतेमुळेच सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी अनास्था असल्याचे चित्र आहे. यावर्षी तरी याला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे खासदार व आमदारांनाही पत्र लिहून प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.योजना अशी आहे...योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा १ लाख रुपये असावीयोजनेअंतर्गत शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रतिजोडपी १० हजार रुपये अनुदान वधूच्या आईच्या नावे दिले जाते.सामुदायिक विवाहाचे आयोजन व विवाह समारंभाचा खर्च करण्यासाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थेस २ हजार रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.महिला व बालविकास विभाग आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविली जातेही योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते.या योजनेची अंमलबजावणी जिल्हा महिला व बालविकास अधिकाºयांमार्फत राबविण्यात येते.या योजनेसाठी वधू ही महाराष्टÑातील संबंधित जिल्ह्णाची स्थानिक रहिवासी असावी. संबंधित व्यक्तीकडे ग्रामसेवक तलाठीचा दाखला असावा.नोंदणी विवाहासाठीही मिळणार अनुदानया योजनेद्वारे कोणी विवाह न करता नोंदणी पद्धतीने विवाह करून खर्चाला फाटा देत असेल तर अशा जोडप्यांच्या नावावर थेट दहा हजारांचे अनुदान महिला व बालविकास विभागातर्फे जमा केले जाणार आहे.