शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

धरण फुटण्याआधी यंत्र देणार धोक्याचा इशारा, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली अत्याधुनिक प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:14 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणफुटीचा धोका ओळखून इशारा देणाऱ्या यंत्रणेविषयी केलेल्या संशोधनाला जर्मन पेटंट मंजूर झाले आहे. या ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणफुटीचा धोका ओळखून इशारा देणाऱ्या यंत्रणेविषयी केलेल्या संशोधनाला जर्मन पेटंट मंजूर झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात धरणभंग आणि पूर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम तानाजी गिरीगोसावी, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील प्रा. परेश मट्टीकल्ली, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागातील डॉ. गणेश सुनील न्हिवेकर आणि विद्यापीठाच्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. तुकाराम डोंगळे यांनी या संदर्भातील संशोधन केले. या संशोधकांनी ‘ॲन इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर दि डिटेक्शन ऑफ डॅम ब्रिचेस, अर्ली वॉर्निंग अँड इव्हॅक्युएशन असिस्टंन्स’ या शीर्षकाने अभिनव संशोधन केले. या अत्याधुनिक प्रणालीद्वारे धरण फुटीचा धोका लवकर ओळखता येतो. त्याद्वारे नागरिकांना तत्काळ इशारा देणे आणि नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरास मदत करणे या बाबी तातडीने करता येऊ शकतात.प्रकल्प संशोधक शुभम गिरीगोसावी यांनी या मॉडेलचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रात्यक्षिक सादर केले असून या अभिनव प्रणालीला विविध तज्ज्ञ संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यासाठी त्यांना दोन राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या संशोधकांचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur University Researchers Develop Dam Breach Early Warning System

Web Summary : Shivaji University researchers developed a system to detect dam breaches early and issue warnings. The German-patented technology aids disaster management, enabling timely evacuations. This innovative system has received national and international accolades for its effectiveness.