शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जॉर्ज फर्नांडीस यांचे गडहिंग्लजशी अतूट नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:00 IST

गडहिंग्लज : अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध आणि विविध सामाजिक चळवळींमुळे जॉर्ज फर्नांडीस यांचे गडहिंग्लजशी अतूट नाते ...

गडहिंग्लज : अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध आणि विविध सामाजिक चळवळींमुळे जॉर्ज फर्नांडीस यांचे गडहिंग्लजशी अतूट नाते होते.१९८६ मध्ये गडहिंग्लज नगरपालिकेच्या डॉ. राममनोहर लोहिया पॅव्हेलियन हॉल व मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते झाले होते. त्यानंतर त्या ठिकाणी देवदासी मुलांचे वसतीगृह सुरू केले. दरम्यान, कोकणातून मुंबईला जाताना गडहिंग्लजमध्ये आवर्जून थांबून येथील एस. टी. कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यावेळी जुन्या बसस्थानकापासून आयलँड चौकापर्यंत कामगारांनी त्यांची मिरवणूक काढली होती. १ एप्रिल १९९३ रोजी गडहिंग्लज येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर जनता दलाचा जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा झाला. त्यास ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह ज्येष्ठ नेत्या मृणालताई गोरे, शंकर धोंडी पाटील व श्रीपतराव शिंदे यांची शेतकऱ्यांनी उघड्या जीपमधून मिरवणूक काढली होती. नूल येथे जनता दलाचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी फर्नांडीस आवर्जून उपस्थित होते.....अन् जॉर्ज कानडीतून बोललेमराठी, हिंदीसह तब्बल १६ भाषेत अस्खलीत बोलणाºया जॉर्ज यांनी नूलच्या सभेत मराठी व हिंदीत बोलायला सुरूवात केली. त्यावेळी सीमाभागातील कानडी शेतकºयांनी त्यांना कानडीतून बोलण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या अस्खलीत कानडी भाषणाने उपस्थित चकीत झाले होते.‘बटाटे’ आणि ‘वेफर्स’..!नव्वदच्या दशकात बटाट्याचे वेफर्स बाजारात यायला सुरुवात झाली होती. त्यादरम्यान गडहिंग्लजला झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी बटाट्याला मिळणारा कवडीमोलाचा भाव, त्यापासून बनविलेल्या ‘वेफर्स’ची किंमत यावरून शेतकºयांना कसे नाडवले जाते, याचा हिशेब मांडला होता.