पन्हाळा परिसरात गव्यांचा कळप, ऊसतोड कामगारांची उडाली भांबेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:48 IST2022-02-04T18:48:17+5:302022-02-04T18:48:34+5:30
प्रसंगवधान राखून ऊसतोड करणार्या फडकर्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला.

पन्हाळा परिसरात गव्यांचा कळप, ऊसतोड कामगारांची उडाली भांबेरी
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील घोटवडे पैकी लव्हटेवाडी परिसरात आज दुपारच्या सुमारास गव्याचा कळप दिसून आला. उसाच्या फडात काम करणाऱ्या ऊसतोड मजुरांना गव्याच्या कळपाचे दर्शन झाले. गव्याचा कळप दिसताच ऊसतोड कामगारांची भांबेरी उडाली.
चव्हाणमळी या शेतामध्ये मधुकर पाटील यांच्या गु-हाळासाठी सकाळपासून ऊसतोड सुरू होती. ऊस तोडून झालेनंतर उसाच्या मोळ्या बांधण्याचे काम सुरू असताना पाठीमागून अचानक गव्यांनी प्रवेश केला. प्रसंगवधान राखून ऊसतोड करणार्या फडकर्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला.
शेतात गवे आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली. वनरक्षक प्रतिभा पाटील, पोलीस पाटील विजया कुंभार, वनपाल विजय दाते व वनरक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन गर्दी पांगविली. तर, गव्यांना नैसर्गिक आदिवासात जाण्यास मार्ग मोकळा करून दिला.