शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

गॅस्ट्रोने आणखी दोघांचा बळी

By admin | Updated: November 28, 2014 23:44 IST

मृतांची संख्या १४ वर : मिरजेत आरोग्य विभागाने घेतले दूषित पाण्याचे नमुने

मिरज : मिरजेत गॅस्ट्रोसदृश आजाराने आनंदा पारिसा कांबळे (वय ६२, रा. समतानगर, मिरज) व श्रीमती सुलोचना आप्पासाहेब चव्हाण (९०, रा. बालाजीनगर, सांगली-मिरज रोड) या दोघांचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोच्या बळींची संख्या चौदांवर पोहोचली आहे. दिवसभरात नव्याने शहरी व ग्रामीण भागातील १७ रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. आनंदा पारिसा कांबळे यांना अतिसाराचा त्रास जाणवू लागल्याने शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सांगली-मिरज रोड परिसरातील बालाजीनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या श्रीमती सुलोचना चव्हाण यांनाही अतिसाराच्या त्रासामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वयोवृद्ध सुलोचना चव्हाण यांच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी पाठविले होते. अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) या त्यांच्या मूळगावी त्यांचा मृत्यू झाला. मिरज शहरात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गॅस्ट्रोचे थैमान सुरूच आहे. शहरात नव्याने गॅस्ट्रोचे १३ रुग्ण आढळले, तर ग्रामीण भागातील चौघांना या साथीची लागण झाली आहे. १७ जणांना उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिरज शहराला आज, शुक्रवारी पुणे आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. कांचन जगताप यांनी भेट देऊन शहरातील गॅस्ट्रोचे रुग्ण आढळलेल्या वखारभाग, नदीवेस, वेताळनगर, कमानवेस, गुरुवारपेठ या भागांची पाहणी केली. त्यांनी या भागातील तपासणीसाठी दूषित पाण्याचे नमुनेही घेतले. आरोग्याच्या दक्षतेबाबत नागरिकांना माहिती देण्याबरोबरच दक्षतेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांच्यासोबत डॉ. सांगले, जिल्हा बालसंगोपनचे डॉ. गिरीगोसावी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी रोहिणी कुलकर्णी उपस्थित होत्या. उपसंचालकांकडून करण्यात आलेल्या गॅस्ट्रो साथीच्या पाहणीचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संभा तालीम, काशीकर मंगल कार्यालय, जामा मशीद, इसापुरे गल्ली, कैकाडी गल्ली व नदीवेस या भागातील जुन्या जलवाहिन्यांवरील नळ कनेक्शन्स खंडित करून नव्या जलवाहिनीवर बसविण्याचे काम सुरू केले आहे.ग्रामीणच्या चौघांना गॅस्ट्रोची लागणमिरज शहरात नवीन १३ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले असतानाच मिरज ग्रामीण भागातील धामणी, कर्नाळ, वड्डी व अंकली या चार गावांतील प्रत्येकी एका रुग्णास गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.