गॅस सिंलेडर घेऊन जाणा-या मालवाहतूक ट्रकच्या केबीनने पेट घेतल्याने खळबळ..मोठा अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:28 IST2020-02-12T13:20:00+5:302020-02-12T13:28:18+5:30
घटनेनंतर कागल पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.

गॅस सिंलेडर घेऊन जाणा-या मालवाहतूक ट्रकच्या केबीनने पेट घेतल्याने खळबळ..मोठा अनर्थ टळला
कागल- : पुणे बंगलोर महामार्गावरकोल्हापूरपासून १३ किमीअंतरावर कागल शहराच्या हद्दीत लक्ष्मी टेकडी जवळ कागल शहरात एच.पी गॅस भरलेले सिंलेडर घेऊन जाणा-या मालवाहतूक ट्रकच्या केबीनने पेट घेतल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. ही आग विझवण्याचा प्रयत्नांत ट्रक चालक बिरा भुजा माने वय 45 रा .भिलवडी जि.सांगली हा चाळीस टक्के भाजला आहे. त्यास कोल्हापुरात प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. घटनेनंतर कागल पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.
कागल पोलीसांनी तात्काळ धाव घेत अग्निशमन गाड्यानां पाचारण केले. कागल एम.आय.डी सी आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन गाड्यांनी आग विझवली. पोलीसांनी पाचशे मिटरचा परीसरात वाहने रोखुन धरली. या ट्रकच्या मागे एका शाळेची सहलीची बस तसेच चार पाच वाहने उभी होती. त्यानांही तात्काळ पाठीमागे पाठवीले होते.