शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'गॅस बुकिंग' ऑनलाईन व्यवस्था कोलमडली, मेसेजही बंद; कोल्हापुरात पोलिस बंदोबस्तात सिलिंडर वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:36 IST

३० दिवसानंतरही बुकिंग होत नसल्याने अडचणी

कोल्हापूर : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस बुकिंगची ऑनलाइन यंत्रणा कोलमडून पडली आहे. पहिला गॅस सिलिंडर घेऊन ३० दिवस झाल्यानंतरही बुकिंग होत नसल्याने ग्राहक हवालदिल बनले आहेत. कार्यालयात जाऊन बुकिंगसंबंधी विचारणार केल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ग्राहकांना बेदखल केले जात असल्याने गॅस वितरक विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस टंचाईही तीव्र होत आहे. परिणामी वितरकांच्या कार्यालयासमोर ग्राहकांची गर्दी होत आहे. नियमित बुकिंगसाठीचे नंबर बंद केले आहेत. त्या नंबरवर डायल केल्यानंतर परत बुकिंगचे मेसेज येणे बंद झाले आहे. यासंबंधी वितरकाकडे विचारणा करण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर कोणाकडूनही समाधानकारक उत्तर दिले जात नाही. कार्यालयातील लँडलाईन फोन उचलून माहिती देणेही अनेक ठिकाणी बंद केले आहे.यामुळे ग्राहकांनी नवीन गॅसचे बुकिंग कसे करायचे ?, कधी करायचे ? कोणाकडे करायचे ? गॅस मिळणार की नाही. मिळाले तर कधी मिळणार ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत. दोन्ही गॅस सिलिंडर संपले असलेल्यांची वाईट अवस्था झाली आहे. त्यांच्या जेवणाचा प्रश्न तयार झाला आहे.

घरपोहोच कधी मिळणार.. माहीत नाही..बुकिंग केलेल्यांना सिलिंडर कधी घरपोहोच मिळणार, हे कोणीही ठोसपणे सांगत नाहीत. चार, पाच, आठ दिवस बुकिंग झाल्यानंतरही ग्राहक कधी गॅस सिलिंडर मिळणार अशी विचारणा करण्यासाठी वितरकांच्या कार्यालयातील संपर्क क्रमांकावर फोन करीत आहेत. व्यवस्थापकाच्या मोबाइलवर संपर्क साधत आहेत. पण सिलिंडर उद्या येईल, परवा येईल, चार दिवसानंतर येईल, असे उत्तर मिळत आहे. हे उत्तर ऐकून वैतागलेला ग्राहक शेवटी कार्यालय गाठून विचारणा करीत आहे. रिकामे सिलिंडर घेऊन कार्यालयाच्या दारात जाऊन अनेक ग्राहक ठाण मांडत आहेत. रांग लावत आहेत. तरीही त्यांना गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संबंधित ग्राहकांचा संयम सुटत आहे.

कुटुंबात सदस्य संख्या अधिक असलेल्यांची कोंडीकुटुंबात सदस्य संख्या जास्त असलेल्यांना गॅस टंचाईची तीव्र झळ बसत आहे. ग्रामीण भागात जळावू लाकूड सहज उपलब्ध होते. तेथे चुलीवर जेवण करणे शक्य आहे. पण शहरात, अपार्टमेंटमध्ये, बंगल्यात चूल कोठे पेटवायची, पेटवली तर त्याला सरपण कोणते वापरायचे, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Online Gas Booking System Collapses; Cylinder Distribution Under Police Protection

Web Summary : Kolhapur faces gas cylinder shortage due to war. Online booking fails, messages stop, causing customer frustration. Distribution under police protection as families struggle.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरCylinderगॅस सिलेंडरkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस