शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: बातमीत प्रतिक्रिया दिल्याच्या रागातून गांजा तस्करांचा तिघांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:59 IST

गारगोटी : "तरुणाईला ओढ गांजाची" या प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये प्रतिक्रिया दिल्याचा राग मनात धरून सम्राट मोरे यांच्यासह तिघांवर पाळत ठेवून दोघांनी हल्ला ...

गारगोटी : "तरुणाईला ओढ गांजाची" या प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये प्रतिक्रिया दिल्याचा राग मनात धरून सम्राट मोरे यांच्यासह तिघांवर पाळत ठेवून दोघांनी हल्ला केला. कुर (ता. भुदरगड) येथे बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. दरम्यान, या निषेधार्थ गुरुवारी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद सम्राट मोरे यांनी भुदरगड पोलिसांत दिली.बुधवारी सकाळी सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, आनंदा देसाई हे शक्तिपीठ महामार्गाच्या बैठकीसाठी चारचाकीतून कोल्हापूर येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कुर बसस्थानकावर आल्यावर नशेत धुंद असलेल्या कुर येथील सुरेश अशोक वड्ड याच्यासह दोघांनी मोरे यांच्या चारचाकी गाडीवर दगड मारून शिवीगाळ केली. कमरेच्या पट्ट्याने आणि दगडाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये म्हसवे येथील आनंदा देसाई हे जखमी झाले. गाडीची मोडतोड केली आहे.गांजा तस्करांनी सामाजिक कार्यकर्ते कॉ. सम्राट मोरे, प्रहारचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र मुगडे व आनंदा देसाई यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आणि गांजा विरोधी जनजागृतीसाठी गुरुवारी (दि. १३) रोजी भुदरगड तालुका बंदची हाक दिली आहे. बंदचे आवाहन जनतेच्या वतीने सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वास्कर यांनी केले आहे. यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई उपस्थित होते.पोलिस पाटील अलर्टबुधवारी पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी पोलिस पाटलांची बैठक घेऊन गावागावात गांजा ओढणारे आणि विकणाऱ्यांची माहिती संकलित करून पोलिस ठाण्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.

लोकमतचे अभिनंदनही घटना घडल्यावर अवघ्या अर्ध्या तासात पोलिस ठाण्यात विविध पक्षांच्या शंभर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यांनी पोलिस निरीक्षकांना गांजावर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले. यावेळी या प्रश्नाला धाडसाने वाचा फोडल्याबद्दल लोकमतचे अभिनंदन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस