शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीशी केले गैरकृत्य, पत्नीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:40 IST

मुलगी घरात एकटी असताना केला विनयभंग

इचलकरंजी : स्वत:च्या अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य केल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीवर गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोक्क्यातील एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला. या कारणावरून गेल्या दोन महिन्यांपासून पती वारंवार ठार मारण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार मुलीच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता २७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.शहापूर येथील तुळजाभवानी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोक्क्यातील आरोपीने  ऑक्टोबर २०२२ मध्ये स्वत:ची मुलगी घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. त्यावेळी मुलगी तेथून पळून गेली. हा प्रकार मुलीने ८ नोव्हेंबरला आईला सांगितला. याबाबत पतीला जाब विचारत पत्नीने पुन्हा असा प्रकार घडल्यास नातेवाइकांना सांगेन. तसेच पोलिसांत तक्रार देईन, असे सांगितले. त्यावर चिडून पतीने पत्नीला धमकी देत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरातील अल्पवयीन मुलगी व मुलाने त्याला बाजूला करत आईची सुटका केली. त्यानंतर १० डिसेंबरला रात्रीच्या सुमारास पुन्हा दोघांच्यात वाद झाला. त्यावेळी पतीने बंदुकीतून पत्नीवर गोळी झाडली. त्यावेळी पत्नीने आपला बचाव केला. पुन्हा २१ डिसेंबरला वाद होऊन पतीने पत्नीचा गळा दाबत ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही मुलानेच त्याला बाजूला ढकलले. वारंवारच्या त्रासाला कंटाळून पत्नीने शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस