शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Kolhapur Crime: पॉलिशच्या बहाण्याने दागिण्यावर डल्ला, परप्रांतीय टोळी जेरबंद; साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:30 IST

सहा जणांच्या टोळीकडून पाच गुन्ह्यांची उकल

उद्धव गोडसेकोल्हापूर: पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने महिलांची दिशाभूल करून दागिने लंपास करणा-या परप्रांतीय टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज, बुधवारी (दि. १) अटक केली. सहा जणांच्या टोळीकडून पोलिसांनी पाच गुन्ह्यांची उकल करून सुमारे साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील सर्व संशयित बिहारमधील असून, त्यांच्यावर बिहारसह सातारा जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी (दि. १) पत्रकार परिषदेत दिली.सचेनकुमार योगेंद्र साह (वय ३८, मूळ रा. जदिया, ता. त्रिवेणगंज, जि. सुपोल, राज्य बिहार, सध्या रा. कागल), बोआ राजू बडई (२५, मूळ रा. परमपार्क, सारसा, सध्या रा. कागल), कुंदनकुमार जगदेव साह (२८, मूळ रा. जदिया, सध्या रा. कागल), आर्यन अजय गुप्ता (१९), धीरजकुमार परमानंद साह (३१, दोघे रा. जमुनिया, जि. भागलपूर) आणि भावेश परमानंद गुप्ता (३५, रा. गोविंदपूर, जि. खगडिया) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.राधानगरी तालुक्यातील वाळवे येथे २० जानेवारी रोजी दोन भामट्यांनी दागिने पॉलिश करून देतो असे सांगून दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबवले होते. या गुन्ह्याची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांकडून संशयित भामट्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, सोने पॉलिशचे काम करणारे काही संशयित कागलमध्ये राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक विनायक सपाटे आणि त्यांच्या पथकाला मिळाली.त्यानुसार कागलमध्ये जाऊन टोळीचा म्होरक्या सचेनकुमार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी याच्या इतर पाच साथीदारांनाही अटक केली. या टोळीकडून जिल्ह्यात पाच ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची उकल झाली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दागिने, मोबाईल, तीन दुचाकी असा सुमारे १३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस