शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात बॅरिकेट्स तोडून पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन, गणेशभक्तांची अधिकाऱ्यांशी वादावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:03 IST

काही संघटनांचे पदाधिकारी आले अन्..

कोल्हापूर : शहरातील गटारे, कारखान्यांचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते तेव्हा पंचगंगेचे प्रदूषण होत नाही का, गणेशमूर्ती विसर्जन करतानाच पंचगंगा कशी प्रदूषित होते, असा सवाल करत गणेशभक्तांनी मंगळवारी प्रशासनाने लावलेल्या बॅरिकेट्स तोडून घरगुती गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीत विसर्जन केले. यावर काही संघटनांचे पदाधिकारी व प्रशासनामध्ये जोरदार वादावादी झाली. प्रशासनाकडून गणेशभक्तांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तरीही गणेशभक्तांनी पंचगंगा नदीतच विसर्जन केले.कोल्हापूर महापालिकेकडून होणाऱ्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा नदी मार्गावर बॅरिकेट्स लावले होते. या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. मात्र, काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाने लावलेले बॅरिकेट्स काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला पोलिसांनी विरोध केला. यावेळी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनीही कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 

वाचा- कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन लाख गणेशमूर्ती दान, १४० टन निर्माल्य संकलन; पावसाची तमा न बाळगता बाप्पांना निरोपमात्र, कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता बॅरिकेट्स तोडून गणेशमूर्तींचे थेट पंचगंगा नदीत विसर्जन केले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू हेही घाटावर आले. त्यांनीही कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या इतर घटकांवर कारवाई न करता गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध का? अशी विचारणाच कार्यकर्त्यांनी केली. यावेळी हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, संदीप सासणे, सुशील भांदिगरे, उदय भोसले, दीपक देसाई, शिवानंद स्वामी, सुनील सामंत उपस्थित होते.काही संघटनांचे पदाधिकारी आले अन्..पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर महापालिकेकडून बॅरिकेट्स लावून रस्ता अडवण्यात आला होता. या ठिकाणी मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही येथे कार्यरत होते. पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले तर नदी प्रदूषित होईल, असे सांगत हे अधिकारी गणेशभक्तांना गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित करू नका, असे सांगत होते. मात्र, सकाळी ११ वाजताच काही संघटनेचे पदाधिकारी आल्यानंतर त्यांनी थेट बॅरिकेट्स तोडून पंचगंगा नदीत मूर्तींचे विसर्जन करायला सुरुवात केल्यानंतर इतर भाविकांनीही पंचगंगेत मूर्ती विसर्जित केल्या.