Kolhapur: गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचा गौरव, सर्वाधिक मोठ्या शस्त्रक्रिया गटात राज्यात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:05 IST2025-04-08T16:03:33+5:302025-04-08T16:05:15+5:30
गडहिंग्लज : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मोठ्या शस्त्रक्रिया गटात सर्वाधिक ६७६ शस्त्रक्रिया करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल गडहिंग्लज उपजिल्हा ...

Kolhapur: गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचा गौरव, सर्वाधिक मोठ्या शस्त्रक्रिया गटात राज्यात प्रथम
गडहिंग्लज : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मोठ्या शस्त्रक्रिया गटात सर्वाधिक ६७६ शस्त्रक्रिया करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव झाला.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याहस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व शल्यविशारद डॉ. चंद्रकांत खोत, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. जीवन पाटील, कार्यालय अधिक्षक महादेव डवरी, परिसेविका छाया वाजंत्री, हेमामालिनी झेंडे, चालक संदीप चव्हाण, सफाईगार अमर कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी आमदार मनिषा कायंदे, सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव डॉ. निपुण विनायक, वीरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथु श्रीरंगानायक, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, डॉ. स्वप्निल नाळे उपस्थित होते.