गडहिंग्लज भूमी अभिलेख : बनावट कजापप्रकरणांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:00 IST2020-12-04T17:57:46+5:302020-12-04T18:00:25+5:30

gdhingalj, kolhapurnews, tahsial गडहिंग्लज भूमीअभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे गेलेल्या बनावट कजाप प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात संबंधित खात्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. तसेच त्या जमिनीच्या खातेदारांनाही म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी (८) रोजी सकाळी येथील भूमीअभिलेख कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

Gadhinglaj land records: Inquiry into fake Kajap cases underway | गडहिंग्लज भूमी अभिलेख : बनावट कजापप्रकरणांची चौकशी सुरू

गडहिंग्लज भूमी अभिलेख : बनावट कजापप्रकरणांची चौकशी सुरू

ठळक मुद्देगडहिंग्लज भूमी अभिलेख : बनावट कजापप्रकरणांची चौकशी सुरूत्या खातेदारांना नोटीसा, संबंधित खात्यांकडूनही मागवला अभिप्राय

गडहिंग्लज : गडहिंग्लज भूमीअभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे गेलेल्या बनावट कजाप प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात संबंधित खात्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. तसेच त्या जमिनीच्या खातेदारांनाही म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी (८) रोजी सकाळी येथील भूमीअभिलेख कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

भूमीअभिलेख उपअधिक्षकांच्या बनावट सही व शिक्यासह येथील तहसील कार्यालयाकडे दाखल झालेल्या बनावट ह्यकजापह्ण प्रकरणाला भूमीअभिलेखची बनावटगिरी वृत्तमालिकेद्वारे ह्यलोकमतह्णने वाचा फोडली. तहसिलदार दिनेश पारगे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भूमीअभिलेख उपअधिक्षक सिद्धेश्वर घुले यांनी रितसर चौकशी सुरू केली आहे.

नेसरी-कोवाड मार्गावरील तारेवाडी गावच्या हद्दीतील गट नंबर १०१ मधील १ हेक्टर ४४ गुंठे आणि गडहिंग्लज शहरातील सर्व्हे नंबर ४५/२ पैकी ०.९७ गुंठे या बिगरशेती जमिनींच्या कजापची नोंद ७/१२ पत्रकी करण्यासाठी भूमीअभिलेखकडून तहसील कार्यालयाकडे अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या खातेदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

तसेच त्या बिगरशेती जमिनीच्या गुंठेवारी/अभिन्यास (ले-आऊट) मंजुरीसंदर्भात तहसिलदार, प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा अभिप्रायदेखील मागवण्यात आला आहे. त्या जमिनींच्या बिगरशेती मंजुरीपासून जमिनीची मोजणी व कजाप तयार करून महसूल विभागाकडे पाठविण्यापर्यंतच्या कालावधीतील भूमीअभिलेख कार्यालयातील अभिलेखपाल, आवक-जावक बारनिशी विभाग लिपीक यांच्यासह आजी-माजी कर्मचारी यांचे लेखी जाब-जबाब नोंदविण्याचे कामदेखील सुरू आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

 भू-खंडधारकही धास्तावले..!

गडहिंग्लज व नेसरी येथील त्या बिगरशेती जमिनीत भू-खंड खरेदी केलेले नागरिक गोंधळून गेले आहेत. कष्टाच्या पैशातून घेतलेल्या भू-खंडाचे काय होणार? या धास्तीने चौकशीसाठी त्यांचे हेलपाटे सुरू झाले आहेत.

Web Title: Gadhinglaj land records: Inquiry into fake Kajap cases underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.