गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:57 IST2021-07-07T15:55:59+5:302021-07-07T15:57:05+5:30
Ncp Petrol Kolhapur: कोरोना महामारीमुळे शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

गडहिंग्लज येथे राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी सिद्धार्थ बन्ने, किरण कदम, उदय जोशी, हारूण सय्यद, राहूल शिरकोळे, शुभदा पाटील, रेश्मा कांबळे, शर्मिला पोतदार आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)
गडहिंग्लज : कोरोना महामारीमुळे शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेले निवेदन येथील प्रांताधिकारी व तहसिलदार यांना शिष्टमंडळाने भेटून देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अच्छे दिनऐवजी बुरे दिन आले आहेत. किंबहुना केंद्राच्या भांडवलदार धार्जिण्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक देशोधडीला लागले आहेत. इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
शिष्टमंडळात, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, नगरसेवक हारूण सय्यद, शुभदा पाटील, रेश्मा कांबळे, किरण कदम, उदय जोशी, महेश सलवादे, उदय परीट, राहूल शिरकोळे, अमर मांगले, रफिक पटेल, सुनिता नाईक, ऊर्मिला जोशी, मनिषा तेली आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होतो.