शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

'गगनबावड्या'चे भवितव्य बुधवारी ठरणार

By admin | Updated: May 4, 2015 00:54 IST

उच्च न्यायालयात सुनावणी : संस्था गटातील ६६ पैकी २३ मतदान स्वतंत्र घेण्याचे आदेश

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्णात २६ केंद्रांवर मंगळवारी (दि. ५) मतदान होत आहे. गगनबावडा तालुक्यातील विकास संस्था गटातील ६६ पैकी २३ मतदान स्वतंत्र घ्या व उर्वरित मतांचीही मोजणी करू नये, असे आदेश न्यायालयाने दिल्याने या गटातील निकाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत बुधवारी सुनावणी होत आहे. जिल्हा बँकेचे विविध गटांतील ७५१२ मतदार आहेत, २१ पैकी करवीर, राधानगरी, हातकणंगले, पन्हाळा तालुका विकास संस्थांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. १७ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत. २६ केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता मतदानाचे साहित्य केंद्रावर पोहोच केले जाईल. रमणमळा येथे मतमोजणीची व्यवस्था केली असून ३६ टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे. गगनबावडा तालुक्यात विकास संस्था गटात ६६ मतदार आहेत, पण उच्च न्यायालयाने यापैकी २३ मतदारांचे स्वतंत्र मतदान घ्यावे व उर्वरित ४३ मतदारांचे मतदान घेऊन मोजणी करावी पण निकाल घोषित करू नये, असे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी बुधवारी (दि. ६) याबाबत न्यायालयात सुनावणी आहे, यावेळी न्यायालय काय निकाल देते त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे डॉ. कदम यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाकडे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. यावेळी साहाय्यक निवडणूक अधिकारी अमित गराडे, नारायण परजणे, सुनील धायगुडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.(प्रतिनिधी)