जवान कांबळे यांच्यावर सुंडी येथे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:20 IST2020-10-27T19:19:46+5:302020-10-27T19:20:32+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान हवालदार संजय परसु कांबळे (वय ४५, मुळगाव सुंडी(ता. चंदगड,सध्या रा.मांजरेकर कॉलनी,नवीन वसाहत हिंडलगा -बेळगांव ) यांच्यावर जन्मगावी सुंडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान कांबळे यांच्यावर सुंडी येथे अंत्यसंस्कार
कोवाड : केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान हवालदार संजय परसु कांबळे (वय ४५, मुळगाव सुंडी(ता. चंदगड,सध्या रा.मांजरेकर कॉलनी,नवीन वसाहत हिंडलगा -बेळगांव ) यांच्यावर जन्मगावी सुंडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
१९९४ मध्ये सांगली येथे सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. भद्राचलम - तेलंगणा येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.त्यांचे पार्थिव गावी आल्यानंतर अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे.
यावेळी आमदार राजेश पाटील, तहसीलदार विनोद रणावरे, पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक यांच्यासह सीआरपीएफचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून त्यांना मानवंदना दिली.