शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kolhapur: यशवंत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाखांचा निधी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:07 IST

जिल्हा परिषदेच्या विविध पुरस्कारांचे वितरण

कोल्हापूर : यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार विजेत्या मोठ्या ग्रामपंचायतींना १५ लाख व छोट्या ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली. कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार, आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट ग्रामपंचायत, यशवंत सरपंच पुरस्कारांचे वितरण मुश्रीफ यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची उभारणी, सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा, शिक्षणासाठी अर्थसहाय्य, अस्पुष्यता निवारणाचा कायदा यासह अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता जाणली होती, त्यांच्या उच्चशिक्षणाला शाहू महाराजांनी पाठबळ दिले. शाहू महाराजांनी समतेचा, पुरोगामी विचारांचा ठसा आपल्या समोर ठेवला आहे. रयतेसाठी, पर्यावरण रक्षणासाठी, प्रशासकीय क्षेत्राच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, कार्य समाजाला मार्गदर्शक आहेत.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला समतेचा संदेश देशाला आजही मार्गदर्शक आहे. शाहू महाराजांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळेच कोल्हापूर जिल्हा अनेक क्षेत्रांत अग्रेसर असून त्यांच्या विचारांनीच कोल्हापूरकरांची वाटचाल सुरू आहे. जिल्हा परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आदर्श शाळा, दवाखाने, पशुसंवर्धन केंद्रे, सौरऊर्जेवर गावांचे विद्युतीकरण, अंगणवाड्यांचे सक्षमीकरण आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील काम उत्कृष्ट आहे. शाहू महाराजांनी शिक्षण, उद्योग, सहकार आदी अनेक क्षेत्रांच्या उन्नतीसाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय समाजाला आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांनी वाटचाल करण्याचा आपण संकल्प करुया. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यापुढेही कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात सर्व बाबींत अग्रेसर ठरवूया. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी आभार मानले.यावेळी माणगाव आणि पिंपळगाव बुद्रुकला जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार वितरित करण्यात आला. माणगावचे सरपंच राजू मगदूम व गोलीवडेच्या ग्रामसेवक विद्या जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, मनिषा देसाई, अरुण जाधव, संभाजी पवार, शिल्पा पाटील, सचिन सांगावकर, अतुल आकुर्डे, डॉ.राजेश गायकवाड, डॉ. प्रमोद बाबर, मीना शेंडकर, वैजनाथ कराड, माधुरी परीट यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

जल्लोषी वातावरणसर्वच पुरस्कार विजेत्यांना कोल्हापुरी फेटे बांधण्यात आले होते. बाराही तालुक्यांतून कुटुंबियांसह पुरस्कार विजेते यावेळी उपस्थित हाेते. पुरस्कार वितरण झाल्यानंतर सेल्फी आणि फोटो काढून घेण्यासाठी व्यासपीठावर पुरस्कार विजेत्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी एकसारखे पोशाख तर महिला सदस्यांनी सारख्या साड्या नेसल्या होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदHasan Mushrifहसन मुश्रीफ