शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

‘धमाल गल्ली’ची मजा लुटा महावीर उद्यानात

By admin | Updated: May 8, 2015 00:14 IST

साडेदहा वाजता प्रारंभ : पारंपरिक खेळांसह विविध उपक्रमांच्या सादरीकरणाची संधी

कोल्हापूर : लहानांसह पालकांच्याही बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांना त्या विश्वाचा आनंद देण्यासाठी ‘लोकमत’ने पुन्हा या रविवारी (दि. १०) ‘धमाल गल्ली’चे आयोजन केले आहे. नागाळा पार्क येथील महावीर उद्यानात सकाळी साडेसहा वाजता हा उपक्रम होईल. सिमेंटच्या जंगलामुळे आणि मोबाईलमुळे लहान मुले पारंंपरिक व शरीराला व्यायाम देणारे खेळ विसरून गेले आहेत. त्यात मोठी मंडळी अर्थात पालक मंडळींनाही लहानांसारखे खेळावेसे वाटते पण कुठे खेळायचे, इतर लोक काय म्हणतील, असा सवाल पडतो. याकरीता ‘लोकमत’ने लहानांसह मोठ्यांनाही सहभागी होऊन मन मानेल तसा कोणताही खेळ खेळता येईल, असा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध केला आहे. फक्त या प्लॅटफॉर्मवर येण्याचे काम बालकांसह पालकांचे आहे. निमित्त आहे महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे आयोजित केलेल्या ‘धमाल गल्ली’चे. या गल्लीत लहानांबरोबर मोठ्या पालकांनाही त्यांच्या इच्छेनुसार कोणताही खेळ खेळता येणार आहे. त्यात अगदी काचेच्या गोट्या, रस्सीखेच, विटी-दांडू, बॅडमिंटन, बॅटबॉल, स्केटिंग, मर्दानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वत:हून त्यात सहभागी होऊन गाणे गाता येईल. त्याचबरोबर ज्यांना काहीच आपले कलागुण स्टेजवर सादर करताना भीती वाटते. त्यांना या ‘धमाल गल्ली’त आपली कला सादर करण्यासाठी छोटे स्टेजही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर रांगोळी काढताही येईल व अनुभवी रांगोळीकारांकडून रांगोळी कशी काढायची हे शिकता येईल. याशिवाय स्केटिंगचे तंत्रशुद्ध धडेही आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षकांकडून शिकताही येतील. मर्दानी खेळांतील बारकावेही लहानांसह मोठ्यांनाही शिकता येतील. याकरीता प्राचीन युद्धकला विशारद मंडळीही या ‘धमाल गल्ली’त आपली कला सादर करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या कलेच्या प्रात्यक्षिकांबरोबरच लाठीकाठी व तलवारबाजी आणि मुलींना आपले संरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षणही देणार आहेत.