शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बनावट कागदपत्रांद्वारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:38 IST

कोल्हापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा ...

कोल्हापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला. न्यू शाहूपुरी येथील महालक्ष्मी मोटर्सचा प्रमुख संजय दत्तात्रय हवालदार (रा. कळंबा, ता. करवीर) आणि कार खरेदी करणारा मयूर बबन शेवाळे (रा. कोपरखैरणे, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत प्रशांत सुकुमार पाटील (वय ४९, रा. साई कॉलनी, पाचगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाचगाव येथील प्रशांत पाटील आणि त्यांचा भाऊ निशांत या दोघांना त्यांच्याकडील दोन जुन्या कारची विक्री करायची होती. न्यू शाहूपुरी येथील महालक्ष्मी मोटर्सचे प्रमुख संजय हवालदार याने दोन्ही कार २४ लाख ७५ हजार रुपयांना विकतो, असे सांगितले. यापैकी एक लाख रुपये देऊन दोन्ही कारचा ताबा घेतला. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन्ही कार कोपरखैरणे येथील मयूर शेवाळे याला विकल्या. याबाबत विचारणा केल्यानंतर हवालदार याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा प्रकार १३ मे ते २३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस