शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वसुलीची रक्कम केली गायब; भारत फायनान्शियलची ३० लाखांची फसवणूक, तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:26 IST

एकास अटक, नांदणीचा फरार

कोल्हापूर : कर्जदारांकडून वसूल केलेली २९ लाख ७३ हजारांची रक्कम गायब करून भारत फायनान्शियल कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी तिघा वसुली कर्मचाऱ्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी संशयित विनायक महादेव घोटणे (तारदाळ, ता. हातकणंगले) याला अटक झाली. अमोल संजय जगताप (रा. पंढरपूर) आणि पवन शिवाजी पवार (नांदणी, शिरोळ) या दोघांचा शोध सुरू आहे. कंपनीने केलेल्या लेखा परीक्षणातून हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक आशुतोष अनंतकुमार साळुंखे (वय २७, रा. सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत फायनान्शियल कंपनीचे सानेगुरुजी वसाहत मुख्य रस्त्यावर कार्यालय आहे. त्या ठिकाणी संशयित अमोल जगताप, विनायक घोटणे व पवन पवार हे तिघे जण वसुली कर्मचारी म्हणून कामाला होते. जगताप याने ऑक्टोबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ कर्जदारांकडून ६ लाख ७२ हजार ८४० रुपये वसूल केले होते. विनायक घोटणे याने ६५ कर्जदारांकडून हप्त्यासाठीचे १८ लाख, ७७ हजार ३३४ रुपये डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ कालावधीत वसूल केले होते. पवार याने २१ कर्जदारांकडून ४ लाख २३ हजार ७३१ रुपयांची वसुली केली होती. कंपनीने त्या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण केले. त्यातून २९ लाखांची तफावत असल्याचे लेखापरीक्षकांच्या लक्षात आले. संशयितांनी ही रक्कम कंपनीत भरली नसल्याचे उघड झाले. या तिघांनी रकमेची अफरातफर केल्याची फिर्याद कंपनीच्या व्यवस्थापकांनी जुना राजवाडा पोलिसांत दाखल केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस