विश्वविक्रमामध्ये कोल्हापुरातील चौघे सायकलस्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 05:08 PM2019-01-30T17:08:31+5:302019-01-30T17:09:41+5:30

हुबळी येथे २६ जानेवारी रोजी १२३५ सायकलस्वारांनी चार किलोमीटरच्या एका रांगेत सायकल चालविण्यासह सर्वांत लांब रांग करण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये याची नोंद झाली असून, यामध्ये कोल्हापुरातील चौघांचा समावेश होता.

Fourth Cyclist in Kolhapur in the world record | विश्वविक्रमामध्ये कोल्हापुरातील चौघे सायकलस्वार

हुबळी येथे सायकलस्वारांनी बनविलेल्या चार किलोमीटरच्या एका रांगेत सायकल चालविण्याच्या विक्रमामध्ये कोल्हापुरातील सुभाष देसाई, रवींद्र चव्हाण, अतुल संकपाळ, प्रकाश पाटील यांचा समावेश होता.

Next
ठळक मुद्देविश्वविक्रमामध्ये कोल्हापुरातील चौघे सायकलस्वारहुबळी येथे विक्रम; १२३५ सायकलस्वारांची चार किलोमीटरची रांग

कोल्हापूर : हुबळी येथे २६ जानेवारी रोजी १२३५ सायकलस्वारांनी चार किलोमीटरच्या एका रांगेत सायकल चालविण्यासह सर्वांत लांब रांग करण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये याची नोंद झाली असून, यामध्ये कोल्हापुरातील चौघांचा समावेश होता.

हुबळी सायकलिंग क्लबतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२३५ भारतीय सायकलस्वार सहभागी झाले होते. २०१६ साली बांग्लादेशातील ११६८ सायकलस्वारांनी ३.२ किलोमीटरच्या लांब रांगेच्या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये होती. तो विक्रम यावेळी मोडण्यात आला.

सायकलस्वारांची ही जगातील सर्वांत मोठी रांग ठरली. सायकल चालविण्यातून मिळणाऱ्या आरोग्य व पर्यावरणीय फायद्यांबाबत जागृतता निर्माण करण्याचा उद्देशातून ही रांग तयार करण्यात आली होती.

या उपक्रमात कोल्हापुरातील मोटार वाहन निरीक्षक सुभाष देसाई, रवींद्र चव्हाण यांच्यासह अतुल संकपाळ व प्रकाश पाटील यांनी सहभाग घेतला. एका रांगेत १२३५ सायकलस्वारांनी एका रांगेत सायकल चालवून ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद केली. यामध्ये कर्नाटकसह, महाराष्ट्र, दिल्ली, जम्मू-काश्मीर, गोवा, आदी राज्यांतून सायकलस्वार सहभागी झाले होते.

 

 

Web Title: Fourth Cyclist in Kolhapur in the world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.