शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

महिला अधिकाऱ्यासह चौघांना अटक

By admin | Updated: June 14, 2015 01:53 IST

रिलायन्स विमा पॉलिसी फसवणूक प्रकरण

 कोल्हापूर : मृत व्यक्तींच्या नावे विमा पॉलिसी उतरवून लाखो रुपयांचा लाभ घेणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या लक्ष्मीपुरी शाखेच्या महिला अधिकाऱ्यासह चौघांना शनिवारी अटक केली. सेल्स मॅनेजर मधुरा शेखर जाधव (वय ३०, रा. राजारामपुरी, ८ वी गल्ली), संदीप पंडितराव सावंत (४०), एजंट अक्षय आनंदा चौगुले (२४, दोघे रा. जरगनगर), कल्पना शिवाजी सोनुले (४०, रा. कागल) अशी त्यांची नावे आहेत. संशयित डॉ. सागर पाटील (रा. साके, ता. कागल) बिनाभाई भट, सचिन बाबुजी मछले हे तिघेजण अद्याप पसार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी मृत झालेल्या नातेवाइकांना पैशाचे आमिष दाखवून, विश्वासात घेऊन मृतांच्या नावे रिलायन्स कंपनीची पॉलिसी उतरवून लाखो रुपयांचा लाभ संशयितांनी घेतल्याचे पुण्यातील डी. एम. आर. इन्व्हेस्टिगेशन या कंपनीने चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाले होते. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सतीश नारे यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी रिलायन्स विमा कंपनीच्या लक्ष्मीपुरी शाखेच्या सेल्स मॅनेजर मधुरा जाधव, संदीप सावंत यांच्यासह एजंट अक्षय चौगुले व कल्पना सोनुले यांना चौकशीसाठी शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये हे चौघेजण दोषी असल्याचे स्पष्ट होताच त्यांना अटक केली. दया करा साहेब रिलायन्सच्या सेल्स मॅनेजर मधुरा जाधव यांच्याकडे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी चौकशी केली असता त्यात त्या दोषी असल्याचे स्पष्ट होताच त्यांना अटक करण्याचे आदेश ठाणे अंमलदारांना दिले. अटकेच्या भीतीने जाधव यांनी दया करा साहेब, लहान मुलगी आहे. आज घरी पाठवा, मी उद्या स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहते, अशी विनवणी केली. त्यावर गोडसे यांनी महिला पोलिसांना बोलवून त्यांना घेऊन जाण्यास सांगितले.