शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोर्लेतील खूनप्रकरणी फरार चौघांना अटक, पै-पाहुण्यांनी कट रचून विकासचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:06 IST

पन्हाळा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील अनैतिक संबंधातून झालेल्या विकास पाटील यांच्या खूनप्रकरणी चार संशयितांना पन्हाळा पोलिस आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांनी सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन अटक केली, तर कटात सामील असणारा पाचवा संशयित आरोपी पंढरीनाथ कांबळे हा अद्यापही फरारी असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

ही कारवाई पन्हाळा पोलिस आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या संयुक्त पथकांनी ३६ तासांत केली. संशयित आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खून प्रकणातील मुख्य संशयित मुख्य आरोपी युवराज शिवाजी गायकवाड (वय ३४ ), शरद बळवंत पाटील (वय ३७, दोघेही रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा), ओंकार शिवाजी वरुटे (वय २५), सोमनाथ पंडित वरुटे (वय २७, रा. आरे, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत.

रविवारी (दि.१९) सांयकाळी विकास पाटील यांचा खून करून पाचही संशयित आरोपी घटना स्थाळावरून पसार झाले होते. युवराजचा मेहुणा शरद पाटील यांनी विकासच्या येण्या-जाण्याची माहिती दिली, तर ओंकार आणि सोमनाथ वरुटे ही युवराजच्या मामाची मुले असून, त्यांनी विकासला मारहाण केली होती. पै-पाहुण्यांनी कट रचून विकासचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना पकडण्यासाठी पन्हाळा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची तीन पथके आरोपींच्या मागावर होती. सोमवारी आरोपीच्या चौकशीसाठी सोमनाथ वरुटे आणि शरद पाटील यांना ताब्यात घेतले होते.

चौकशीतून हे दोघेजण खुनाच्या कटात सामील असल्याची बाब समोर आल्याने सोमवारी दोघांना अटक केली होती. सोमवारच्या मध्यरात्री मुख्य आरोपी युवराज गायकवाड आणि ओंकार वरुटे ज्योतिबा-केर्ली फाट्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री १:३० च्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. यातील पाचवा आरोपी पंढरीनाथ कांबळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.सातारा येथून येताना अटकविकासचा खून केल्यानंतर शरद पाटील हा पोर्ले, तर सोमनाथ वरुटे हा आरे गावात होता. या दोघांना चौकशीतून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. मुख्य आरोपी युवराज गायकवाड आणि ओंकार वरुटे हे दोघे रविवारी निगवे (ता. करवीर) येथील परिसरात रात्रभर होते. त्यानंतर सोमवारी दोघेही साताऱ्याला गेले होते. दिवसभर तेथे थांबून सांयकाळी साताऱ्यातून ट्रकने कोल्हापूर येताना ज्योतिबा-केर्ली फाट्यावर रात्री १:३० वाजता उतरले होते. अंधारात उभे असलेल्या युवराज आणि ओंकारला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी पकडून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस